शेतकऱ्यांनो! स्वराज, महिंद्राचे मार्केट जाणार, आयशरने आणलाय CNG ट्रॅक्टर, वाचा खासियत
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Tractor News : आतापर्यंत आपण CNG वर चालणाऱ्या कार आणि ऑटोबाबत ऐकले आणि पाहिले आहे. पण आता शेतकऱ्यांना CNGवर चालणारे ट्रॅक्टरही वापरता येणार आहेत शेतकरी आजही शेतीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत.
मुंबई : आतापर्यंत आपण CNG वर चालणाऱ्या कार आणि ऑटोबाबत ऐकले आणि पाहिले आहे. पण आता शेतकऱ्यांना CNGवर चालणारे ट्रॅक्टरही वापरता येणार आहेत शेतकरी आजही शेतीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. मात्र डिझेलच्या वाढत्या किंमती आणि पर्यावरणातील घसरणीमुळे आता एक स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक पर्यायाची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आयशर कंपनीकडून Eicher 485 D-CNG हा नवीन ट्रॅक्टर मार्केटमध्ये आणला आहे.
डिझेल आणि CNGचा दुहेरी वापर करता येणार
हा ट्रॅक्टर केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही सुरक्षित आहे. यात डिझेल आणि CNG दोन्हीचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे इंधन खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते.
कमी इंधन खर्च
CNGची किंमत डिझेलपेक्षा खूप कमी आहे. हे ट्रॅक्टर सुमारे 60% CNG आणि 40% डिझेलवर चालतो. त्यामुळे सुमारे 50% इंधन खर्चात बचत होऊ शकते.
advertisement
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान
CNG हे स्वच्छ आणि हरित इंधन मानले जाते. त्यामुळे धूर आणि कार्बन उत्सर्जन कमी होते, जे पर्यावरणासाठी फायदेशीर ठरते.
दमदार कार्यक्षमता
या ट्रॅक्टरमध्ये 45 हॉर्सपॉवर क्षमतेचा शक्तिशाली इंजिन आहे. अवजड वाहतुकीसह सर्व शेतीकामांसाठी उपयुक्त ठरेल.
शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर योग्य का?
इंधन खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे ट्रॅक्टर मोठा दिलासा ठरू शकतो.
कमी देखभाल खर्च आणि अधिक मायलेजमुळे दीर्घकाळ उपयोगी येईल.
advertisement
पर्यावरणपूरक दृष्टिकोन असलेले शेतकरी आता अशा ट्रॅक्टरला प्राधान्य देत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 20, 2025 11:13 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनो! स्वराज, महिंद्राचे मार्केट जाणार, आयशरने आणलाय CNG ट्रॅक्टर, वाचा खासियत