कुळ असलेली वर्ग-2 जमिनीचे रूपांतर वर्ग -1 मध्ये कसं करायचे? नियम अटी काय आहेत?

Last Updated:

Agriculture News : शेतजमिनींच्या मालकी हक्क आणि कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात कुळवहिवाट कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत कसणाऱ्याला ‘कुळ’ अशी ओळख मिळते.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : शेतजमिनींच्या मालकी हक्क आणि कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात कुळवहिवाट कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत कसणाऱ्याला ‘कुळ’ अशी ओळख मिळते आणि त्याच्या नावाची नोंद सातबारा उताऱ्यावरील “कुळ/इतर हक्क” या रकान्यात केली जाते. कुळाच्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 प्रकारात येतात, म्हणजे अशा जमिनींचे हस्तांतरण शासनाच्या परवानगीशिवाय करता येत नाही. मात्र, ठराविक प्रक्रियेअंती या जमिनींचे रूपांतर भोगवटादार वर्ग-1 मध्ये करता येते.
कुळ म्हणजे कोण?
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 (2012 मध्ये याचे नाव बदलले गेले) नुसार, दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या कसणारा, जमिनीच्या बदल्यात खंड देणारा व मालकाने हा खंड स्वीकारलेला असणारा व्यक्ती म्हणजे कुळ होय. तो जमीन मालकाच्या कुटुंबातील नसावा, जमीन गहाण नसावी आणि तो केवळ पगारावर ठेवलेला नोकर नसावा.
कुळाचे प्रमुख प्रकार
advertisement
कायदेशीर कुळ - अधिनियमातील कलमानुसार वैधरीत्या जमीन कसणारा व्यक्ती.
संरक्षित कुळ - 1 जानेवारी 1938 पूर्वी किमान 6 वर्षे अथवा 1 नोव्हेंबर 1947 रोजी सतत कसणारा.
कायम कुळ - 1955 पूर्वी वहिवाट, रुढी किंवा न्यायालयीन निकालामुळे कायम मान्यता मिळालेला.
वर्ग-2 जमीन वर्ग-1 मध्ये कशी करावी?
कुळाच्या जमिनीचे रूपांतर करण्याचा अधिकार तहसीलदारांकडे असतो. इच्छुक शेतकरी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करू शकतात. त्यासाठी खालील प्रक्रिया होते.
advertisement
अर्ज दाखल - तहसीलदार यांच्याकडे आवश्यक माहितींसह अर्ज सादर करणे महत्वाचे ठरते.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
1960 पासूनचे सातबारा उतारे
फेरफार नोंदी
खासरापत्रक
कुळ प्रमाणपत्र
कुळ चलन व फेरफार
सुनावणी व चौकशी – तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल, तसेच जाहीर प्रगटनाद्वारे आक्षेप नोंदवण्याची संधी मिळते. ही प्रक्रिया झाल्यानंतर आक्षेप नसल्यास तहसीलदार रूपांतराचा आदेश काढतात.
advertisement
किती वेळेत पूर्ण होते प्रक्रिया?
सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यास साधारणतः 1 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर सातबाऱ्यावरून “कुळ/इतर हक्क” काढून टाकले जातात आणि जमीन वर्ग-1 म्हणून नोंदवली जाते.
हा बदल फक्त संबंधित अर्जदाराच्या जमिनीपुरता मर्यादित असतो. म्हणजेच गटजमिनीमध्ये सर्वांची नोंद एकत्रित बदलली जात नाही, तर अर्जदाराच्या मालकीच्या हद्दीपुरतीच केली जाते. हे लक्षात ठेवणे गरजेचे असते.
advertisement
महत्वाचे मुद्दे
कुळ जमीन वर्ग-1 झाल्यानंतर त्या जमिनीवरील शासन निर्बंध संपुष्टात येतात.
अशी जमीन विकणे, खरेदी करणे किंवा वारसाहक्काने हस्तांतर करणे सुलभ होते.
कुळाच्या नोंदी काढण्यासाठी तहसील कार्यालय हा मुख्य प्राधिकृत अधिकारी असतो.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, कुळ जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रूपांतरित करायची असल्यास तहसीलदारांकडे अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे जोडणे, चौकशी व सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करणे आणि शासनाने ठरविलेला नजराणा भरणे आवश्यक आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सातबाऱ्यावर कायमस्वरूपी वर्ग-1 नोंद होते.
मराठी बातम्या/कृषी/
कुळ असलेली वर्ग-2 जमिनीचे रूपांतर वर्ग -1 मध्ये कसं करायचे? नियम अटी काय आहेत?
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement