कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 2 लाख 25 हजार 621 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 1 लाख, 31 हजार 092 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास कांद्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 296 ते जास्तीत जास्त 1351 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 380 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1300 ते 2500 रुपये सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
गहू अन् तांदळात रसायनांचा वापर करताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर शरीरावर होतील हे गंभीर परिणाम
मक्याच्या दरास उठाव
राज्याच्या मार्केटमध्ये मक्याची एकूण 10 हजार 788 क्विंटल आवक राहिली. आज जळगाव मार्केटमध्ये 3065 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक होवून त्यास 1688 रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 412 क्विंटल मक्यास सर्वाधिक 3200 रुपये बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल मक्यास 2550 सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
सोयाबीन उत्पादकांची फरपट
राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची 54 हजार 111 क्विंटल एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केट मध्ये सर्वाधिक 24 हजार 158 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3400 ते 4343 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. वर्धा मार्केटमध्ये आवक झालेल्या 1118 क्विंटल सोयाबीनला 3250 ते 4388 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला. नांदेड मार्केटमध्ये सर्वात कमी 2 क्विंटल सोयाबीनची आवक होवून त्यास 4050 रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
सोयाबीन खरेदी केंद्रे अद्याप सुरू नाहीत
अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सोयाबीनसाठी 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला; तरी शासकीय खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून अवघ्या 4400 रुपयांमध्ये सर्वाउत्तम दर्जाचे सोयाबीन लुटले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फरपट आणि पदरात तोटा कायम आहे.