नेटकऱ्यांकडून जोरदार टीका झाल्यावर अखेरीस सोहेल खानला स्वतः पुढे येऊन सार्वजनिकरित्या माफी मागावी लागली आणि त्याने हेल्मेट न घालण्यामागील कारणही सांगितले.
सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण
सोहेल खानने 'एक्स' वर एक पोस्ट लिहून या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सर्व बाईकस्वारांना हेल्मेट घालण्याची विनंती केली, पण याचसोबत तो म्हणाला की, त्याला क्लॉस्ट्रोफोबियाचा त्रास असल्यामुळे तो अनेकदा हेल्मेट घालू शकत नाही. त्या बंदिस्त जागेत गुदमरल्यासारखे वाटते. सोहेल खानने लिहिले, “मी स्वतः अनेकदा हेल्मेट घालत नाही, कारण मला गुदमरल्यासारखे वाटू लागते. पण हे कोणतीही सबब नाही. बाईक चालवणे हे लहानपणापासूनच माझे पॅशन राहिले आहे."
advertisement
त्याने पुढे स्पष्ट केले, "मी सहसा रात्री उशिरा बाईक चालवतो, जेव्हा ट्रॅफिक नसते. मी खूप हळू आणि आरामात गाडी चालवतो आणि कोणताही धोका पत्करत नाही. मी तुम्हाला वचन देतो की, मी माझ्या घुसमटीच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करेन आणि यापुढे हेल्मेट घालूनच बाईक चालवेन."
ट्रॅफिक पोलिसांची माफी मागितली
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोहेल खानला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन करण्यासोबतच त्याने व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ केल्यामुळे तो अडचणीत आला होता. यावर पडदा टाकण्यासाठी सोहेल खानने सार्वजनिकरित्या माफी मागितली. त्याने वाहतूक पोलिसांची माफी मागताना असे आश्वासन दिले की, तो पुन्हा कधीही नियमांचे उल्लंघन करणार नाही. सोहेल खानच्या या स्पष्टीकरणानंतर काही चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला, तर काहींनी 'तुम्ही सेलिब्रिटी आहात, त्यामुळे नियमांचे पालन केलेच पाहिजे', असे म्हणत त्याला धारेवर धरले.
