Ranveer Singh: 'वो वक्त आने पर...', Dhurandhar च्या सक्सेसने रणवीर सिंग नाखुश, पोस्टमधून कोणाला मारला टोमणा?

Last Updated:
Dhurandhar Success: 'धुरंधर'ने दुसऱ्या वीकेंडमध्येही अनेक मोठे रेकॉर्ड्स तोडले. चित्रपटाला मिळालेल्या या अमाप यशाबद्दल रणवीर सिंगने सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक नोट शेअर केली.
1/14
मुंबई: अभिनेता रणवीर सिंगच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरलेल्या 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे! प्रदर्शित होऊन अवघे १० दिवस झाले असतानाच या स्पाय-थ्रिलर चित्रपटाने भारतात ३५० कोटी रुपयांचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे.

advertisement
2/14
फ्रँचायझी चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडण्यापासून ते परदेशात नवीन रेकॉर्ड्स सेट करण्यापर्यंत, या चित्रपटाने २०२५ मधील सर्वात प्रभावी चित्रपट म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.

3/14
साकनिल्कच्या अहवालानुसार, 'धुरंधर'ने दहाव्या दिवशी, म्हणजेच दुसऱ्या रविवारी, ५९ कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाची देशांतर्गत एकूण कमाई ३५१.७५ कोटी झाली आहे.

4/14
ग्रॉस कलेक्शनचा विचार केल्यास ही कमाई ४२२ कोटी इतकी झाली आहे. व्यापार तज्ज्ञांच्या मते, हा चित्रपट लवकरच ५०० कोटी आणि ६०० कोटी रुपयांचा टप्पा सहज पार करेल.

5/14
'धुरंधर'ने जागतिक स्तरावर ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. या जबरदस्त कमाईमुळे त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांचे लाईफटाईम कलेक्शन रेकॉर्ड्स मोडले आहेत.

6/14
रजनीकांतचा 'कूली' (५१८ कोटी), शाहरुख खानचा 'डंकी' (४७० कोटी), हृतिक रोशनचा 'वॉर' (४४९ कोटी), अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (३६५ कोटी) या सर्व मोठ्या हिट्सना 'धुरंधर'ने मागे टाकले आहे.

7/14
सध्या २०२५ मध्ये जागतिक स्तरावर 'कांतारा: चॅप्टर वन', 'छावा' आणि 'सैयारा' हे फक्त तीन चित्रपटच 'धुरंधर'च्या पुढे आहेत. रणवीर सिंगच्या करिअरसाठी 'धुरंधर' हा खऱ्या अर्थाने लाईफ चेंजिंग चित्रपट ठरला आहे.

8/14
या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंगने अखेर सोशल मीडियावर आपले मौन सोडले आहे आणि एक क्रिप्टिक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

9/14
'धुरंधर'ने दुसऱ्या वीकेंडमध्येही अनेक मोठे रेकॉर्ड्स तोडले. चित्रपटाला मिळालेल्या या अमाप यशाबद्दल रणवीर सिंगने सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक नोट शेअर केली.

10/14
रणवीर सिंहने लिहिले, “किस्मत की एक बहुत खूबसूरत आदत है, की वो वक्त आने पर बदलती है... लेकिन फिलहाल... नजर और सब्र.
रणवीर सिंहने लिहिले, “किस्मत की एक बहुत खूबसूरत आदत है, की वो वक्त आने पर बदलती है... लेकिन फिलहाल... नजर और सब्र."
advertisement
11/14
रणवीरने व्यक्त केलेले हे शब्द त्याच्या सध्याच्या यशाबद्दल आणि भविष्यातील अपेक्षांबद्दल खूप काही सांगून जातात. 'धुरंधर'ने केवळ रणवीरच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरवला नाही, तर त्याचे बॉक्स ऑफिसवरील स्थानही पुन्हा पक्कं केलं आहे.

12/14
रणवीर सिंग बऱ्याच काळापासून ब्लॉकबस्टर चित्रपटाची वाट बघत होता. त्याचे मागील ब्लॉकबस्टर चित्रपट सिम्बा (२४० कोटी रुपये) आणि पद्मावत (३०२ कोटी रुपये) २०१८ साली रिलीज झाले होते.
रणवीर सिंग बऱ्याच काळापासून ब्लॉकबस्टर चित्रपटाची वाट बघत होता. त्याचे मागील ब्लॉकबस्टर चित्रपट 'सिम्बा' (२४० कोटी रुपये) आणि 'पद्मावत' (३०२ कोटी रुपये) २०१८ साली रिलीज झाले होते.
advertisement
13/14
2019 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या गली बॉय या चित्रपटाने 140 कोटींची कमाई केली. 2023 मध्ये आलेला त्यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपटही हिट ठरला होता.
2019 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या 'गली बॉय' या चित्रपटाने 140 कोटींची कमाई केली. 2023 मध्ये आलेला त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपटही हिट ठरला होता.
advertisement
14/14
तथापि, २०१९ ते २०२३ दरम्यान रणवीरचे ८३, जयेशभाई जोरदार आणि सर्कस हे चित्रपट फ्लॉप झाले. सात वर्षांनंतर, रणवीरच्या धुरंधरने बॉक्स ऑफिसवर लक्षणीय यश मिळवले आहे.

Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement