मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात साजरी केली जाते. यंदाच्या जयंतीला 'शिवबाचं नाव' हे गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. 'बिग हिट मीडिया' प्रस्तुत या गाण्यात सर्वसामान्य प्रजा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मधील अतूट नातं दाखवण्यात आलंय. मराठमोळा अभिनेता विशाल निकमनं छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. निक शिंदे, रितेश कांबळे, विशाल फाले, तृप्ती राणे आणि वैष्णवी पाटील अशी तगडी इन्स्टाग्राम रिल्स स्टार्सची टीमही गण्यात दिसतेय. बिग बजेट असणाऱ्या या गाण्याबाबत सध्या सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
गाणं घालतंय धुमाकूळ
'शिवबाचं नाव' गाण्याचे संगीतकार प्रशांत नाकती आणि गायिका सोनाली सोणावेणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "छत्रपती शिवरायांसाठी मला एक गाणं करायचंच होतं. फक्त ते कसं करावं याचा विचार आणि तयारी सुरु होती. पण अखेर सगळं काही जुळून आलं आणि आता ते गाणं रिलीज झालं आहे. महाराजांवर गाणं करायचं तर बजेटमध्ये कोणतीही तडजोड नको होती. त्यामुळे हवा तसा शिवकालीन सेट तयार करता आला. तसेच सगळ्या कलाकारांनीही या गाण्यात तितकाच जीव ओतला. त्यामुळे आज हे गाणं सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतं आहे" अशी प्रतिक्रिया संगीतकार प्रशांत नाकती यांनी दिली आहे.
शिवजयंतीला गाजणार 'शिवबाचं नाव', नव्या गाण्याचा अमेरिकेत डंका, अभिनेता विशाल निकमनं सांगितला अनुभव
अंगावर शहारे आणणारा प्रसंग
एकंदरीतच छत्रपती शिवरायांच्या मालिकांना किंवा चित्रपटांना प्रेक्षकांचं जसं भरभरून प्रेम मिळतं तसंच प्रेम शिवरायांच्या या गाण्यालाही मिळालं आहे. गाण्यातील गोंधळाचा सीन अनेकांना आवडला आहे. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग असल्याचं चाहते सांगतात. तसेच या गाण्याचं कौतुक करतात, त्यामुळे खूप खूश असल्याचं गायिका सोनाली सांगते.
आदर्श, सोनालीचा आवाज
दरम्यान, प्रशांत नाकती यांचे संगीत असलेले 'शिवबाचं नाव' हे गाणं निर्माते हृतिक अनिल मनी व अनुष्का अविनाश सोलवट यांनी निर्मित केलंय. हे गाणं महाराष्ट्रातील आघाडीचे गायक आदर्श शिंदे व ट्रेंडिंग गायिका म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली सोनावणे यांनी गायलंय. तर सुप्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकती व संकेत गुरव यांनी या गाण्याच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.
बिग बजेट गाणं
या गाण्याच्या दिग्दर्शनाची व छायाचित्रणाची दुहेरी जबाबदारी अभिजीत दाणी याने उत्तमरीत्या साकारली आहे. हे गाणं मराठी अल्बम सृष्टीतील सर्वात महागडं म्हणजे बिग बजेट गाणं म्हटलं जातं. तसचं या गाण्याच्या भव्यदिव्य चित्रिकरणाबद्दलही बरीच चर्चाही होतेय. गाण्यात जबरदस्त नृत्य, उत्साहानं भरलेलं संगीत, शिवकालीन माहौल अशा अनेक गोष्टी पाहाण्यासारख्या आहेत.