मुंबई: मुंबईला स्वप्ननगरी म्हणून ओळखळं जातं. त्यामुळे आपलं स्वप्न साकार करण्यासाठी अनेक लोक राज्यातून आणि परराज्यातून मुंबईत दाखल झाले आणि ते मुंबईकरच झाले. या स्थलांतरितांच्या पोटाची भूक भावगविणारे अनेक जुने उपहारगृह आणि भोजनालय मुंबईत पाहायला मिळतात. प्रत्येक उपहारगृहाचे आपले वेगळे वैशिष्ट्य आहे. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या दादरच्या गजबजलेल्या गर्दीत तुम्हाला भूक लागली तर तुमच्यासाठी 83 वर्षांची परंपरा असणारा एक उत्तम पर्याय आहे. 1941 साली सुरू झालेलं न्यू श्रीकृष्ण भोजनालय हे शुद्ध शाकाहारी मराठमोळं जेवण देण्याचं काम आजही करतंय.
advertisement
दादा कोडंके, अशोख सराफ यांनी दिली भेट
दादर रेल्वे स्थानकापासून न्यू श्रीकृष्ण भोजनालय एक मिनिटाच्या अंतरावर दादर पश्चिमेस नक्षत्र मॉलसमोर आहे. छोटुबुवा गोखले यांनी 1941 साली न्यू श्रीकृष्ण भोजनालयाची सुरुवात कामगार वर्ग आणि कलाकारांसाठी केली होती. तेव्हाच्या काळात अस्सल मराठमोळी थाळी ही फक्त 2 रुपयाला मिळत असे. उमेदिच्या काळात अशोक सराफ, दादा कोंडके यांसारखी दिग्गज कलाकार मंडळी इथे जेवायला येत असे. छोटुबुवा गोखले हे संगीताचे चाहते होते, त्यामुळे ते या उपाहारगृहात अनेक कार्यक्रम देखील करत असत, अशी आठवण राहुल पाटगावकर यांनी सांगितली.
50 पेक्षा जास्त प्रकार, सुंदर इनडोअर प्लांट मिळण्याचं दादरमधील बेस्ट ठिकाण, VIDEO
काय आहेत दर?
न्यू श्रीकृष्ण भोजनालय येथील जेवणाच्या किमती पाहायला गेलं तर 170 रुपयात आपल्याला अस्सल मराठमोळी थाळी मिळते. मिनी पंजाबी थाली 140, झुणका- भाकरी 100 रुपयांत इथे उपलब्ध आहे. तसेच दररोज येथील भाज्या आणि इतर गोड पदार्थांचे मेन्यू बदलत असतात. भोजनालयाची वेळ दुपारी 12 ते 3:30 तसेच संध्याकाळी 7:00 ते 10:30 अशी आहे. येथे एका वेळेस 55 लोकांची बसण्याची सोय आहे. यांच्याकडे शिरा, बटाटा वडा, झुणका भाकर, श्रीखंड या पदार्थांना विशेष मागणी असते. तसेच दुपारच्या वेळी विशेष मराठमोळी थाळी खाण्यासाठी सगळेच गर्दी करतात.
राहण्याचीही सोय
भोजनालया व्यतिरिक्त या ठिकाणी राहण्याची देखील सोय आहे. एका माणसाची एका दिवसाची राहण्याची सोय ही फक्त 500 रुपयांमध्ये होते. तुम्ही जर मुंबईच्या बाहेरून कधी आलात आणि दादरमध्ये राहण्याची सोय पहात असाल तर तुम्हाला जेवण आणि राहण्याची सोय एका छताखाली कमी किमतीत मिळून जाईल. तुम्हालाही दादर मध्ये असल्यावर मराठमोळ्या पौष्टिक अन्नाचा आस्वाद घ्यायचा असेल तर न्यु श्रीकृष्ण भोजनालयाला भेट देऊ शकता.