वर्धा : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. आणि अशा वातावरणात शरीरातील उष्णता देखील वाढत असते. त्यामुळे शरीर उन्हाळ्यात देखील थंड कसा राहील याकडे लक्ष देणं फार गरजेचं ठरतं. तर योगा आणि प्राणायामांच्या माध्यमातून देखील आपण उन्हाळ्यात वाढणारी शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवू शकतो आणि उष्णतेमुळे होणाऱ्या विकारांवर देखील आराम मिळू शकतो. त्यामुळे कोणते योगा आणि प्राणायामे आसने करून आपण शरीरातील उष्णता कमी करू शकतो याबद्दच वर्धा येथील योगशिक्षिका ज्योति शेटे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
शितली प्राणायाम
सर्वप्रथम हे प्राणायाम करताना खालचे आणि वरचे दात एकमेकांना लावायचे आहेत आणि जीभ हनुवटीला लावायची आहे. तसेच दाताच्या फटीमधून आता श्वास आत घ्यायचा आहे. आणि तोंड बंद करून नका वाटे श्वास सोडायचा आहे. या प्राणायामामुळे शरीरातील तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते.
थायरॉईडच्या समस्येला करा कायमचं दूर, हे आयुर्वेदिक उपचार आहेत रामबाण उपाय
शितकाली प्राणायाम
शितकाली प्राणायाम करण्यासाठी सर्वप्रथम जिभेची पुंगळी बनवायची आहे म्हणजेच असा आकार देऊन श्वास आत घ्यायचा आहे. आणि नाकावाटे सोडायचा आहे. असे हे दोन्ही प्राणायाम अगदी सोपे आहेत. दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा प्राणायाम कोणीही करू शकतो. तसेच डाव्या नासिकेला चंद्र नासिका असेही म्हणतात. ही थंडतेचे प्रतीक आहे. उजवी नासिका बंद करून डाव्या नासिक येणे श्वास घ्यायचा आहे आणि डाव्याचा नासिकेने श्वास सोडायचा आहे ही क्रिया केल्याने ही शरीरातील तापमान थंड राहण्यास मदत होते, असे योगशिक्षिका ज्योती शेटे सांगतात.
नौकासन
नौकासन हे देखील फार महत्वाचं योगासन आहे. सरळ लेटून डोकं, पाठ आणि पाय उचलून हात पायाकडे सरळ ठेवायचे आहेत. या आसनामुळे पोटातील शरीरातील उष्णतेचे प्रमाण तर कमी होतेच, सोबतच पोटाचे स्नायू ही मजबूत होतात आणि पोटाची चरबी देखील कमी होण्यास मदत होते.
उपाशीपोटी सकाळी फळे खावीत का? जाणून घ्या आहार तज्ज्ञांचा सल्ला
जानू शिरसासन
जानू शिरसासन हे देखील खूप प्रभावी योगासन मानले जाते. या योगासनासाठी एक पाय पलटी करून दुसरा पाय मोकळा करायचा आहे आणि डावा पाय सरळ केला असता उजवा हात आणि आणि डावा हात त्या पायाच्या अंगठा पर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामुळे मनाची एकाग्रता वाढते स्फूर्ती वाढते, ऊर्जाही वाढते.
भु नमनासन
हे आसन करताना दोन्ही पाय मोकळे करून हात पायाच्या अंगठ्यांना टिकवून डोकं जमिनीला टेकवायचं आहे. अशाप्रकारे वक्रासन हे देखील शरीर थंड ठेवण्यासाठी प्रभावी आहे, अशी माहिती योगशिक्षिका ज्योती शेटे यांनी दिली आहे.





