थायरॉईडच्या समस्येला करा कायमचं दूर, हे आयुर्वेदिक उपचार आहेत रामबाण उपाय
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आजकाल थायरॉईड ही झपाट्याने वाढणारी गंभीर समस्या आहे .त्यामुळे थायरॉईडचे लक्षणे काय? आणि त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने कोणते उपचार केले जाऊ शकतात पाहा
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : आजकाल थायरॉईड ही झपाट्याने वाढणारी गंभीर समस्या आहे. हा आजार गळ्यात असलेल्या थायरॉईडच्या ग्रंथींच्या दुष्परिणामांमुळे होतो. दिवसेंदिवस या आजाराचे भारतामध्ये रुग्ण वाढत असताना दिसून येतात. साधारणतः भारतामध्ये सव्वाचार कोटींपेक्षा जास्त रुग्ण या समस्येने ग्रस्त आहेत. त्यातल्या त्यात महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण सर्वात जास्त बघायला मिळते. गरोदरपणा किंवा प्रसूती नंतरही प्रमाण वाढलेले दिसून येते. त्यामुळे थायरॉईडचे लक्षणे काय? आणि त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने कोणते उपचार केले जाऊ शकतात यासंदर्भातच वर्धा मधील आयुर्वेद डॉक्टर नितीन मेशकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
थायरॉईड म्हणजे नेमकं काय?
थायरॉईड म्हणजे आपल्या घशामध्ये एक छोटीशी ग्रंथी असते. फुलपाखराच्या आकाराची ही ग्रंथी असते. त्यामधून काही संप्रेरके स्त्रवित होत असतात. या संप्रदायांचे प्रमाण जर कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. संपूर्ण शरीराला व्यवस्थित ठेवण्याचं कार्य थायरॉईड ग्रंथी करत असते. मेंदूचं कार्य, हृदयाचं कार्य, स्नायूंचं कार्य यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ग्रंथीची संप्रेरके महत्त्वपूर्ण ठरतात.
advertisement
उपाशीपोटी सकाळी फळे खावीत का? जाणून घ्या आहार तज्ज्ञांचा सल्ला
त्याचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर, या व्याधी उद्धभवतात. जर जास्त प्रमाणात संप्रेरके निर्माण झाली तर त्याला हायपर थायरॉईटेजम म्हणतात. तर अशावेळी रुग्णाला खूप घाम येणे, थकवा येणे, उष्णतेचा त्रास होणे, डोके दुखणे, झोप न येणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. तर या उलट संप्रेरके कमी स्त्रवित झाले तर त्याला हायपो थायरॉईड म्हणतात. अशावेळी वजन वाढणे, शरीरावर सूज आणि हाता पायावर सूज येणे, केस गळणे आणि मासिक पाळीच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवणे, अशा समस्या दिसून येतात, असं डॉक्टर नितीन मेशकर सांगतात.
advertisement
हे आहेत आयुर्वेदिक उपचार
view commentsथायरॉईड हा आजार किंवा समस्या निश्चित बरी होऊ शकते. फक्त रुग्णाला नियमित व्यायाम सकस योग्य आहाराची गरज असते. थायरॉइडमध्ये वजन वाढतं, सूज येते पाळीच्या समस्या उद्धभवतात. त्यासाठी दालचिनी आणि सुंठ जर नियमित रोज सकाळी मधाबरोबर घेतली तर थायरॉईडच्या समस्येवर अराम मिळवता येऊ शकतो. त्याचबरोबर त्रिकुटु चूर्ण/त्रिफळा चूर्ण रोज घेतलं तरीही फायदा जाणवू शकतो. औषधी आणि आहार विहाराबरोबरच पंचकर्माचा देखील थायरॉईड आजारावर चांगला परिणाम दिसून येतो. वामन चिकित्सा आणि विरेचन चिकित्सा तसेच रक्तमोक्षण आणि बस्तीचिकित्सा करून घेतल्यास थायरॉईड आजारावर आराम मिळवता येऊ शकतो, असं नितीन मेशकर सांगतात.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
February 22, 2024 3:31 PM IST

