अशी असते रीत
लग्नाच्या दिवशी सर्व रीती पार पडल्यानंतर वरात निघताना महिलांनी वधूची ओटी भरली जाते. त्यातले तांदूळ वधू पाच वेळा दोन्ही हाताने ओंजळीत भरून मागे फेकते. हे तांदूळ जोराने मागे फेकताना वधूच्या मागे असलेल्या महिला ते तांदूळ आपल्या पदरात झेलत असतात. ही विधी केल्याने वधूचे माहेर आणि वधू धनधन्याने सदैव समृद्ध असते अशी मान्यता आहे. खरंतर वधू म्हणजेच मुलगी ही आई-वडिलांची मुलगीच नाही तर ती घरची लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे ती दुसऱ्याच्या घरी जाताना या विधीतून आई-वडिलांप्रति कृतज्ञता व्यक्त करत असते, अशी माहिती पंडित हेमंत शास्त्री सांगतात.
advertisement
लग्नाळूंसाठी खूशखबर! यंदा या महिन्यात आहेत सर्वाधिक विवाह मुहूर्त
तांदूळ फेकण्याचं कारण
वास्तविक असं मानलं जातं की मुलगी ही घरची लक्ष्मी असते. जर तिने पाठवणीच्या वेळी हा विधी केला तर तिच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. जेव्हा वधू तांदूळ मागे फेकते तेव्हा ती अपेक्षा करते की धन धान्याने संपन्न असो. दुसरीकडे, असाही एक विश्वास आहे की हा विधी आपल्या पालकांना आणि कुटुंबाचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत त्यांनी तिच्यासाठी जे काही केले त्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते, असंही पाचखेडे महाराज सांगतात.





