TRENDING:

ब्युटी पार्लर सुरू करण्याचा विचार करताय? किती येईल खर्च? पाहा Video

Last Updated:

अनेक महिला ब्युटी पार्लरच्या व्यवसायात येऊ इच्छित असतात. त्यासाठीच ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पाहा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे, प्रतिनिधी 
advertisement

वर्धा : मेकअप हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. यासाठी महिला या ब्युटी पार्लरमध्ये जातात. त्यामुळे अनेक महिला ब्युटी पार्लरच्या व्यवसायात येऊ इच्छित असतात. त्यासाठीच ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणकोणते स्किल्स महत्त्वाचे आहेत? तुम्ही कमीत कमी खर्चात घरीच ब्युटी पार्लर कसे सुरू करू शकता? या संदर्भात वर्धा येथील ब्युटीशियन प्रीती खडसे माहिती दिली आहे.

advertisement

किती येईल खर्च? 

ब्युटी पार्लर हा आजकालचा एक ट्रेडिंग व्यवसाय झालेला आहे. सर्व महिला ब्युटी पार्लर करू इच्छितात. ब्युटी पार्लर घरच्या घरी सुरू करता येते आणि त्यासाठी फार मेहनत किंवा खूप जास्त खर्च येत नाही. ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक ब्युटी पार्लरचा चांगला कोर्स करून घेऊन स्वतःला ब्युटी शियन बनवता येईल. जास्तीत जास्त 25 हजार रुपयांमध्ये तुम्हाला चांगलं पार्लर सुरू करता येऊ शकते. ज्यामध्ये तुम्हाला एक चांगली हायड्रोलीक चेअर म्हणजेच खुर्ची लागेल. 4-5 हजारांपर्यंत खुर्ची उपलब्ध होऊ शकते. आणि एक मोठा आरसा जो 2-3 हजारांपर्यंत मिळू शकतो. तसेच पार्लरसाठी उपयोगात येणाऱ्या सर्व कॉस्मेटिक्स आणि वस्तू, ट्रॉली महत्त्वाच्या असणार आहेत.

advertisement

agriculture : कमी वेळात व्हायचंय करोडपती, तर मग ही शेती करा, खूप जास्त मिळेल नफा

घरीच होईल सुरवात 

ब्युटी पार्लर हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरीच सुरू करू शकता. यासाठी तुमच्या घरी तुम्हाला एक छोटीशी सेपरेट रूम पाहिजे आहे. कारण पार्लरमध्ये सतत स्त्रिया येत असतात. त्यासाठी घरात एक सेपरेट रूम असायला हवी. ज्यामध्ये तुम्हाला पार्लरच्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत.

advertisement

स्वच्छतेची काळजी 

क्लायंटला स्वच्छता खूप आवडत असते खरंतर स्वच्छता ठेवणं हे पार्लरमध्ये खूप महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक क्लायंटची त्वचा सारखी नसते. त्यासाठी तुम्हाला हायजिन पाळण महत्त्वाचा आहे. पाण्याचा बाऊल असो किंवा स्पंच तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे प्रत्येक वेळी वेगळाच स्पंज किंवा रुमाल वापरायचा आहे. तसेच पार्लरमधील इतरही गोष्टी इतरही वस्तू स्वच्छ ठेवायचे आहे. आणि पार्लरमध्ये असलेल्या कॉस्मेटिक्स ह्या चांगल्या प्रतीच्या वापरायच्या आहेत लोकल वस्तू वापरायच्या नाहीत.

advertisement

सलून व्यवसाय करायचा आहे, तर मग हे ठिकाण आहे तुमच्यासाठी उत्तम पर्याय, मिळतील स्वस्त वस्तू

दिवसेंदिवस अपडेट होण्याची गरज 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

त्यानंतर प्रत्येक ब्युटी शियनला दिवसेंदिवस अपडेट होण्याची गरज असते. कोणकोणत्या नवनवीन मेकअप पद्धती किंवा ट्रेंडिंग गोष्टी तसेच मोठ्या आर्टिस्ट कडून शिकावयाच्या काही गोष्टी या सर्व गोष्टींविषयी ब्युटी शियनला अपडेट असणं गरजेचं असतं. आणि तसेच व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा देखील चांगला वापर करता आला पाहिजे. आपल्या क्लाइंटला चांगल्या सोई पुरवठा आल्या की व्यवसाय चांगला ग्रोथ होईल,अशी माहिती ब्युटीशियन प्रीती खडसे यांनी दिली.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ब्युटी पार्लर सुरू करण्याचा विचार करताय? किती येईल खर्च? पाहा Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल