कढीपत्त्याच्या चटणीसाठी साहित्य
1) कढीपत्त्याची स्वच्छ पाने 2)3-4 लाल मिरच्या 3) तीळ 4)मीठ 5) जिरे 6) लिंबू
दोनच साहित्य आणि 5 मिनिटांत नाश्ता तयार, विदर्भात फेमस आहे ही रेसिपी
कशी बनवायची कढीपत्त्याची चटणी?
सर्वप्रथम कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची. एका कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्त्याची सर्व पाने टाकायची आहेत. कढीपत्त्याची पाने दोन ते तीन मिनिटे भाजून झाल्यानंतर त्यात लाल मिरच्या अॅड करून त्याही चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. नंतर जिरे, मीठ आणि तीळ अॅड करून चांगले एकत्र करून घ्यायचे. सर्व साहित्य दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायचे आहे. आता कढीपत्ता खमंग भाजून झाला असून कुरकुरीत झाला आहे. थोडं थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. त्यानंतर कढीपत्त्याच्या चटणीची चव वाढवण्यासाठी लिंबू पिळायचे आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात थोडं खोबरं देखील अॅड करू शकता.
advertisement
वेस्टपासून बेस्ट, जास्त पिकलेल्या केळीपासून बनवा उपवासाची चविष्ट रेसिपी, Video
कढीपत्ता काढून टाकू नका
कढीपत्ता अनेकांना नकोसा वाटतो. मात्र त्याचे फायदे भरपूर आहेत. अनेकांच्या घरी शुगरचे रुग्ण असले की त्यांच्याकडे ही रेसिपी आवर्जून बनवली जाते. कारण कढीपत्ता हा शुगर नियंत्रण ठेवण्यात मदत करतो. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही मदत होते. केसांच्या समस्येवरही कढीपत्ता फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही देखील कमी वेळेत, कमी साहित्यात आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून ही चविष्ट कढीपत्याची चटणी नक्की करून बघा.