उपवासाला थालीपीठचे 4 प्रकार
श्रावण महिन्यात अनेक जण उपवास करतात. उपसला आपल्याकडे प्रामुख्याने साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी आणि भगर हे पदार्थ बनवतात. पण उपासाला थालीपीठही आपण ट्राय करू शकता. यामध्ये तुम्ही साबुदाण्याचे थालीपीठ, भगरीचे थालीपीठ, शिंगाड्याचे थालीपीठ, राजगिरा थालीपीठ आणि मिक्स थालीपीठ असे चार प्रकारचे वेगवेगळे थालीपीठ तयार केले जातात. आपण हे सर्व एकत्र करून मिक्स थालीपीठही बनवू शकता.
advertisement
कांदा पोहेतर नेहमीच खात असाल पण कधी रस्सा पोहे खाल्ले आहेत का? ‘इथं’ आहेत प्रसिद्ध
थालीपीठ तयार करायची पद्धत
मिक्स थालीपीठ करण्यासाठी साबुदाण्याचे पीठ, भगरीचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, शिंगाड्याचे पीठ हे समप्रमाणामध्ये घ्यायचे. यामध्ये बाइडिंगसाठी एक उकडून घेतलेला बटाटा, चवीपुरतं मीठ व हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा. जर तुम्हाला जिरे आवडत असतील तर तुम्ही जिरे सुद्धा यामध्ये टाकू शकता. या सर्वांना छान मिक्स करून घ्यायचं व थोडे थोडे पाणी घालून गोळा तयार करून घ्यायचा. जास्त घट्ट किंवा पातळ गोळा करायचा नाही. तर मिडीयम गोळा बनवून घ्यायचा.
आईशप्पथ, चक्क दुधाची मिसळ? कुठे मिळतोय हा भन्नाट प्रकार?
थालीपीठसाठी गोळा तयार झाल्यानंतर खाली एक पॉलिथिन बॅग किंवा सुती कपडा घ्यायचा. त्यावरती तेल किंवा तूप लावायचं आणि त्यावर थालीपीठ थापायला सुरुवात करायची. थालीपीठ छान गोल करायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला जाड व पातळ करू शकता. थालीपीठला छान छोटे छोटे चार-पाच छिद्र करायचे. त्यानंतर मिडीयम गॅस वरती छान थालीपीठ भाजून घ्यायचं. अशा प्रकारे उपवासाचं मिक्स थालीपीठ खाण्यासाठी तयार होईल.
तुम्हाला जर साबुदाणा, भगर, राजगिरा, शिंगाडा याचं थालपीठ करायचं असेल तर वरील पद्धतीनेच ते बनवू शकता. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत उपासाच्या लोणच्या सोबत खाऊ शकता. त्यासाठी ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करा.