बीडमधले फोर व्हिलर कार एक्स्पर्ट विनय आगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार. 'चार चाकी वाहनांमध्ये चुकीचं इंजिन टाकण्याच्या घटना हल्ली वारंवार घडत आहेत. त्यामुळे गाडी खराब होऊन त्या दुरुस्तीसाठी येण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलंय.
14 वर्षांचा मुलगा अपघातात गेला, कुटुंबीयांनी दाखवलं धाडस; 7 जणांना मिळालं नवं आयुष्य
advertisement
'पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांचे आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचे इंजिन वेगवेगळे असते. पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये गाडी चालू करण्यासाठी स्पार्किंग प्लग असतात तर डिझेल गाड्यांमध्ये फ्युएल इन्जेक्टर असतात. इंधनांच्या प्रकारात डिझेल हे पेट्रोलपेक्षा जड असते. तर पेट्रोल हे डिझेलपेक्षा अधिक ज्वलनशील असते.'
काय कराल उपाय?
तुमच्या कारमध्ये पेट्रोलच्या जागी डिझेल किंवा डिझेलच्या जागी पेट्रोल टाकले असेल तर सुरुवातीला ती गाडी सुरू न करता एका साईडला घ्यावी. त्या परिसरातील गॅरेज चालकाशी संपर्क करून तात्काळ गाडीच्या इंधन टँकमध्ये चुकीमुळे गेलेले डिझेल अथवा पेट्रोल काढून टाकावे.
शेतकऱ्यांची लेकरंही घडाघडा बोलतात स्पॅनिश; पुण्याच्या ZP शाळेतील अनोखा प्रयोग
चुकीचे इंधन टाकल्यास इंजिन सुरू करू नका. कार धक्का मारुन साईडला करा. मेकॅनिकच्या मदतीने, इंधन टाकीतील इंधन बदलून घ्या आणि मिश्रित इंधन काढून टाका.नवीन पेट्रोल टाकल्यावरच गाडी सुरू करा, असा सल्ला आगवान यांनी दिला.ट
'डिझेल कारमध्ये पेट्रोल टाकल्यास मशीनच्या भागांमधील घर्षण वाढते. त्यामुळे पंप इंधन लाईनसह निकामी होऊ शकतो. त्यानंतरही तुम्ही इंजिन सुरुच ठेवून कार चालवल्यास इंजिन खराब होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हा प्रकार कळाल्यास कार अजिबात सुरू करू नका. ती ताबडतोब मेकॅनिककडे नेण्याची व्यवस्था करा,' असा सल्ला त्यांनी दिला.