TRENDING:

या तारखेपासून सुरू होतोय चातुर्मास, या काळात नेमकं काय करावं, कोणत्या गोष्टी करू नयेत, संपूर्ण माहिती

Last Updated:

चातुर्मास कधी सुरू होत आहे, चातुर्मासात काय करावे व काय करू नये. याबाबतची माहिती जालना शहरातील ज्योतिषाचार्य डॉ. राजेश महाराज सामनगावकर यांनी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना : दरवर्षी देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. आषाढ शुक्ल एकादशी तिथीला देवशयनी एकादशीचा उपवास केला जातो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू 4 महिने योगनिद्रात जातात. त्यानंतर जगाच्या पालनपोषणाची जबाबदारी भगवान शंकर यांच्याकडे जाते. त्यामुळे चातुर्मास कधी सुरू होत आहे, चातुर्मासात काय करावे व काय करू नये. याबाबतची माहिती जालना शहरातील ज्योतिषाचार्य डॉ. राजेश महाराज सामनगावकर यांनी दिली.

advertisement

चातुर्मास कधी सुरू होतोय?

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पंचांगाच्या आधारावर पाहिले तर आषाढ शुक्ल एकादशी तिथी 16 जुलै रोजी रात्री 08:33 पासून सुरू होत आहे आणि 17 जुलै रोजी रात्री 09:02 वाजता समाप्त होईल. उदयतिथीवर आधारित, देवशयनी एकादशी 17 जुलैला आहे, त्यामुळे 17 जुलैपासून चातुर्मास सुरू होईल.

भगर खाण्याचे आहेत भरपूर फायदे, अनेकांना माहिती नसेल, तज्ज्ञांनी काय सांगितलं?

advertisement

चातुर्मासात काय करू नये -

1. चातुर्मासातील 4 महिन्यांमध्ये शुभविवाह आणि साखरपुडा यासारखी शुभ कार्य करू नयेत.

2. नवीन घराचा गृहप्रवेशही चातुर्मासात केला जात नाही.

3. चातुर्मासाच्या काळात आपण आपल्या सून किंवा मुलीला निरोपही देत ​​नाही. तो अशुभ मानला जातो.

4. चातुर्मासात मुंडन, उपनयन संस्कार करणेसुद्धा निषिद्ध आहे.

5. चातुर्मासात नवीन दुकान किंवा नवीन काम सुरू करणेही टाळले जाते.

advertisement

पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी! आषाढी एकादशीचा उपवास का केला जातो, ही आहे यामागची कहाणी

चातुर्मासात काय करावे -

1. चातुर्मासाच्या काळात तुम्ही भगवान शिव, माता पार्वती आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा करावी. चातुर्मासात शिव परिवाराची पूजा केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात.

2. चातुर्मासात तुम्ही भगवान विष्णूची पूजा करू शकता. एकादशीचे व्रत आणि उपासना करण्यावर कोणतेही बंधन नाही.

advertisement

3. चातुर्मासात ब्रह्मचर्याचे नियम पाळा. दररोज स्नान करून पूजा करावी. यामध्ये योगासने, ध्यान, जप, तपश्चर्या इ.

4. चातुर्मासात मन, कृती, वचन शुद्ध ठेवा आणि दान करा. एका वेळी अन्न खा आणि जमिनीवर झोपा.

चातुर्मासात या गोष्टी टाळाव्या -

1. चातुर्मासाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी पावसाळा असतो. त्यामुळे वांगी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, गरम मसाला आणि तेल असलेले अन्न खाऊ नये.

2. चातुर्मासाच्या चार महिन्यात मांस, मद्य, सिगारेट, लसूण, कांदा इत्यादी तामसिक गोष्टींचे सेवन करू नये, अशी माहितीही ज्योतिषाचार्य डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितले.

सूचना - ही बातमी ज्योतिषाचार्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
या तारखेपासून सुरू होतोय चातुर्मास, या काळात नेमकं काय करावं, कोणत्या गोष्टी करू नयेत, संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल