जालना : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेचा त्रास माणसांबरोबर जनावरांनाही होत असतो. तापमानात झालेल्या वाढीमुळे जनावरांच्या शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे जनावरांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये वेगवेगळे बदल होतात आणि यामुळेच दुधाळ जनावरांची दूध देण्याची क्षमतादेखील कमी होते.
यासोबतच अनेक जनावरांच्या दुधाला फॅटदेखील लागत नाही. या कारणांमुळे दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. काही सोपे उपाय करून आपण दुधाळ जनावरांचे दूध वाढवू शकतो. त्याचप्रमाणे दुधाला योग्य प्रमाणात फॅट देखील येऊ शकतो.
advertisement
मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात उन्हाळ्याच्या दिवसात तापमान 40 ते 45 अंशांच्या दरम्यान असते. एवढ्या प्रचंड तापमानामध्ये जनावरांची चयापचय क्रिया मंदावलेली असते. त्यामुळे जनावरांची दूध देण्याची क्षमताही कमी होते. जनावरांसाठी 28° c एवढं तापमान हे दूध देण्यासाठी अतिशय उपयुक्त असून या तापमानाला जनावरे सर्वात चांगल्या प्रमाणात दूध देतात.
तर तापमान वाढल्याने आतड्यांची हालचाल कमी प्रमाणात होते. त्यामुळे जनावरांनी खाल्लेला चारा हा अबझोर्ब कमी प्रमाणात झाल्याने दूध देण्याचे प्रमाणदेखील कमी होतं. वाढत्या तापमानामुळे जनावरांमध्ये हार्मोन्समध्येही बदल होतात. जनावरांमधील हार्मोन्स सिक्रीशन कमी झाल्याने दुधाचे प्रमाण कमी होण्याबरोबरच उन्हाळ्याच्या दिवसात दुधाळ जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण देखील कमीच असतं.
वधू पाहत होती वाट, पण वऱ्हाड्यांवर काळाचा घाला, 6 जणांचा जागीच मृत्यू, हादरवणारी घटना
याचबरोबर तापमान वाढल्याने जनावरांचा चारा खाण्याचे प्रमाणदेखील अतिशय मंदावलेला असते. त्यामुळे जनावरांना थंड ठिकाणी ठेवावं किंवा मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्याचा अवलंब करावा. जनावरांच्या आजूबाजूला निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर दुधाळ जनावरांना उच्च प्रतीचा चारा खाण्यास द्यावा ज्यामध्ये प्रथिने कर्बोदके आणि खनिजे असतील. याप्रकारे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेतल्यास नक्कीच दूध उत्पादनात तर वाढ होईल. तसेच दुधाला चांगल्या प्रकारे फॅट देखील लागेल.