जानेवारीपासून आतापर्यंत 3 पार्लरवर कारवाई
ठाणे शहर पोलिसांनी शहरातील तीन बेकायदेशीर हुक्का पार्लरच्या आड चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर धडक कारवाई केली. ठाणे पोलीस दलाकडून अनेक बेकायदेशीर बाबींवर कारवाई करणे सुरू आहे. ठाण्यात 2025 च्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत एकूण 3 हुक्का पार्लरवर छापे टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यावर कायद्यानुसार गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहे.
advertisement
Weather Update : सूर्य आग ओकणार, राज्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा अलर्ट
बेकायदेशीर प्रवृत्तींवर ‘झिरो टोलरन्स’ हे धोरण
ठाणे शहरातील तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मॉल्स, कॅफे आणि हँग आऊट्स येथे विशेष गुप्त तपासणी सुरू आहे. शहरात अशा ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश स्थानिक पोलीस स्टेशन ला देण्यात आले आहेत. ठाणे पोलीस यंत्रणेने अशा बेकायदेशीर प्रवृत्तींवर ‘झिरो टोलरन्स’ हे धोरण अवलंबिले आहे. पुढील काळातही अशा हुक्का पार्लरच्या आड सुरू असणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याची मोहिम आणखी वेगाने राबविण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी दिली आहे.






