TRENDING:

ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात, पाहा कशी घ्यावी पिकांची काळजी?

Last Updated:

बदललेल्या हवामानामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना: राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. या ढगाळ हवामानाचा विपरीत परिणाम शेत पिकांवर होत आहे. सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, मका, गहू तसेच करडे यासारखी पिके उभी आहेत. या पिकांवरती मावा तसेच लष्करी आळी, घाटे आळी आदी किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर योग्य ती फवारणी करून पिकांचे संरक्षण करणे गरजेचे झाला आहे. या ढगाळ हवामानामध्ये शेतकऱ्यांनी कोणती फवारणी? कोणत्या पिकावर घ्यावी? याविषयी जालन्यातील कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे कार्यरत असलेल्या कीटक शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी माहिती दिलीय.

advertisement

हरभरा

बदललेल्या हवामानामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी आपल्या पिकांवर योग्य ती फवारणी करून होणारे नुकसान टाळू शकतात. जिल्ह्यामध्ये हरभरा पिकाची पेरणी तीन टप्प्यांमध्ये झाली आहे. सध्या हरभरा पीक काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत तर काही ठिकाणी घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. ढगाळ हवामानामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव हरभरा पिकावर होऊ शकतो. घाटे अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण निंबोळी अर्काचा वापर करू शकतो. 10 मिली निंबोळी अर्क प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून आपण त्याची फवारणी करू शकतो. रासायनिक कीटकनाशकांमध्ये इमेमेक्टीन बेंजोएट 5 टक्के या कीटकनाशकाची फवारणी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून केली तर आपण घाटे अळीचे व्यवस्थापन करू शकतो, असं अजय मिटकरी यांनी सांगितलं.

advertisement

क्लार्क व्हायला गेला अन् बँक मॅनेजर झाला, कोरोनात नोकरी गमावलेल्या शेतकरी पुत्राची संघर्षगाथा, Video

ज्वारी

पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा ज्वारीचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ढगाळ हवामानामुळे ज्वारी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मावा ही एक रस शोषण करणारी कीड आहे. रस शोषण केल्यानंतर झाडावर चिकट द्रव तयार होतो. शेतकरी याला चिकटा आला असे देखील म्हणतात. याचे व्यवस्थापन देखील आपण निंबोळी अर्काची फवारणी करून करू शकतो. रासायनिक कीटकनाशकांमध्ये डायमोथोइड 30 टक्के हे कीटकनाशक आपण 20 मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारू शकतो.

advertisement

मकर संक्रांतीला वाणाला देण्यासाठी बनवा घेवर; बनवण्याची सोपी रेसिपी पाहाच

करडई

जिल्ह्यातील अनेक शेतकरी करडईचे पीक देखील घेत असतात. करडईवर देखील ज्वारी प्रमाणेच मावा आणि चिकटा या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण निंबोळी अर्काचा तसेच डायमोथोइड 30 टक्के 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण वापरू शकतो आणि होणारे संभाव्य नुकसान टाळू शकतो, असं कीटक शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात, पाहा कशी घ्यावी पिकांची काळजी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल