नोकरी सोडून नाविन्यपूर्ण शेतीचा ध्यास
हिंगणघाट तालुक्यातील कान्होली कात्री येथील महेश पाटील आणि त्यांच्या पत्नी भारती पाटील असं या उच्चशिक्षित शेतकऱ्यांचं नाव आहे. वर्धा किंवा विदर्भासारख्या उष्ण ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्याचा विचार कोणीही केला नव्हता. कारण स्ट्रॉबेरीला जगण्यासाठी थंड हवामानाची गरज असते. आजपर्यंत महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद विदर्भवासी घ्यायचे मात्र या दाम्पत्याने वर्ध्यातच स्ट्रॉबेरी पिकवून नाविन्यपूर्ण शेतीचा सुखद अनुभव घेतलाय. हे दोघेही खाजगी नोकरी करत होते. मात्र शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोगाची संकल्पना डोक्यात होती. त्यामुळे नोकरी सोडून स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्धार केला. आता हीच स्ट्रॉबेरी या दाम्पत्याला लाखोंचा फायदा मिळवून देतेय.
advertisement
शेतकऱ्यांनो, ही संधी सोडू नका, अनुदानावर मिळतायेत गाई म्हशी, Video
सुरुवातीला प्रयोग म्हणून पाटील यांच्याकडे 10 हजार रोपे होती. त्यांनी पाऊण एकर शेतीमध्ये लावून तब्बल दीड लाखांचा नफा मिळविला. त्यानंतर अधिक आत्मविश्वासाने यंदा ऑगस्टमध्ये 5 एकर जमिनीवर स्ट्रॉबेरी लागवड केलीय. त्याला एकूण अंदाजे 20 लाखांचा खर्च लागला असून सध्या काढणी आणि विक्री सुरू आहे आणि त्यातून 60 ते 65 लाखांचं उत्पादन होऊन त्यातील 40 लाखांचा फायदा होण्याची अपेक्षा पाटील व्यक्त केलीय.
MBA तरुणाने नोकरी सोडून केली शेती, सेंद्रीय पेरू विक्रीतून लखपती
सोबतच जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी पुढे येण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडूनही केला जात असून पाटील यांनी पाच एकर जमिनीवर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण आठ शेतकऱ्यांची मिळून 11 एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड केली गेली आहे. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची चव वर्धच्या मातीतून विदर्भाला अधिक गोडव्यासह चाखायला मिळते आहे. या आनंदाची बाब म्हणावी लागेल.





