TRENDING:

Mumbai Local: लोकलच्या गर्दीतून सुटका! मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेचा प्लॅन ठरला, नव्या वर्षात...

Last Updated:

Mumbai Local: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता लोकलच्या गर्दीतून प्रवास करण्याची गरज नाही. लवकरच 15 डब्यांची ट्रेन धावणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. येत्या वर्षभरात 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढवली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक जागा आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळेल. या उपक्रमासाठी सध्या सुरू असलेल्या स्थानकांच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग देण्यात आला आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा! मध्य रेल्वेवर वाढणार १५ डब्यांच्या लोकल्स.
रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा! मध्य रेल्वेवर वाढणार १५ डब्यांच्या लोकल्स.
advertisement

मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) 34 स्थानकांपैकी 27 स्थानकांचे विस्तारीकरण डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे सुरुवातीला 12 डब्यांच्या सुमारे 10 लोकल गाड्या 15 डब्यांमध्ये रूपांतरित केल्या जातील. पुढील टप्प्यात आणखी गाड्या या श्रेणीत सामील केल्या जातील. फास्ट आणि स्लो अशा दोन्ही प्रकारच्या लोकल्समध्ये ही वाढ होणार आहे.

Mumbai Local Train: अखेर मध्य रेल्वेला आली जाग, आता धावणार 15 डब्यांच्या लोकल; गर्दीचा ताण होणार कमी

advertisement

या स्थानकांवर विस्तारीकरण

विस्तारीकरणाच्या कामात विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवपुरी, पळसधरी, कर्जत, खोपोली, मुंब्रा, कोपर, कळवा, शहाड, ठाकुर्ली, कसारा, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव, आटगाव आणि शैलू यांसारख्या स्थानकांचा समावेश आहे. या कामांमध्ये प्लॅटफॉर्म लांबी वाढवणे, सिग्नल प्रणालीचे आधुनिकीकरण आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उभारणे यांचा समावेश आहे.

दरम्यान, सीएसएमटी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वांगणी, खडवली आणि दावणगेरे ही सात स्थानके तांत्रिक कारणांमुळे पुढील टप्प्यात पूर्ण होतील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीला केला रामराम, 2 मित्रमैत्रिणीने सुरू केला यशस्वी फूड ब्रँड, कमाई तर पाहा
सर्व पहा

दरवर्षी, नोव्हेंबरमध्ये रेल्वेचे वेळापत्रक बदलले जाते. परंतु या वर्षी विस्तारकामांमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काम पूर्ण झाल्यानंतर नववर्षात नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल. याशिवाय मध्य रेल्वेत लवकरच आणखी एक नवीन वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेन येणार आहे. सध्या 6 एसी लोकल दररोज 80 फेऱ्या करतात. नव्या एसी लोकलमुळे प्रवाशांना अधिक सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: लोकलच्या गर्दीतून सुटका! मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेचा प्लॅन ठरला, नव्या वर्षात...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल