मुख्य मार्गावर मेगाब्लॉक
मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक राहणार आहे. सीएसएमटी मुंबईहून सकाळी 10:58 ते दुपारी 3:10 दरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद मार्गाच्या गाड्या माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या सर्व नियोजित स्थानकांवर थांबतील. या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर अंदाजे 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
advertisement
मुंबईला उष्णतेचा येलो अलर्ट, या 4 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पाहा हवामानाचा अंदाज
ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. ठाण्याहून सकाळी 11:25 ते दुपारी 3:27 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या गाड्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, माटुंगा पर्यंत सर्व स्थानकांवर थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातीले. या गाड्या देखील सुमारे 15 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावरील गाड्या रद्द
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यानच्या रेल्वे सेवा सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत बंद राहतील. सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल पर्यंत सकाळी 10:34 ते दुपारी 3:36 दरम्यान सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गाच्या सर्व सेवा रद्द केल्या जातील. तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशी ते सीएसएमटी पर्यंतच्या अप हार्बर मार्गाच्या सेवा देखील सकाळी 10:16 ते दुपारी 3:47 दरम्यान रद्द केल्या जातील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि कुर्ला-पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
दरम्यान, हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ मार्गाचा वापर करण्याची परवानगी असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.