मुंबईला उष्णतेचा येलो अलर्ट, या 4 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पाहा हवामानाचा अंदाज

Last Updated:

राज्यातील वातावरणात विचित्र बदल घडून आले आहेत. काही ठिकाणी उन्हाचा पारा तर काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे.

+
News18

News18

मुंबई : मार्च महिन्यात राज्यातील वातावरणात अनेक बदल घडून येत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा पारा तर काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. 22 मार्चसाठी मुंबई आणि ठाण्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात 22 मार्च रोजी राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लातूर आणि धाराशिवमध्ये वादळासह आणि विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुर्गम भागात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
मुंबईत 22 मार्चला उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तापमानात वाढ झाल्याने मुंबईत दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 22 मार्च रोजी मुंबईत मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं.
22 मार्च रोजी पुण्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहून दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात अंशतः घट झालेली दिसून येत आहे.
नाशिकमधील तापमानात 2 अंशांनी वाढ होऊन तेथील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 22 मार्च रोजी मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
नागपूरमधील तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 22 मार्च रोजी नागपूरमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी अंशतः ढगाळ आकाश राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या सर्व जिल्ह्यांत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मुंबईला उष्णतेचा येलो अलर्ट, या 4 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पाहा हवामानाचा अंदाज
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement