BMC Election : 'पुन्हा येईन' म्हणणाऱ्या माजी नगरसेवकांना गेम होण्याची धास्ती, बीएमसी निवडणुकीबाबत मोठी अपडेट...

Last Updated:

BMC Elections : राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'पुन्हा येईन' म्हणणाऱ्या माजी नगरसेवकांना गेम होण्याची धास्ती, बीएमसी निवडणुकीबाबत मोठी अपडेट...
'पुन्हा येईन' म्हणणाऱ्या माजी नगरसेवकांना गेम होण्याची धास्ती, बीएमसी निवडणुकीबाबत मोठी अपडेट...
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यास काही दिवसांची प्रतिक्षा आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बदललेल्या समीकरणात मुंबई महापालिकेच्या बहुतांशी माजी नगरसेवकांना पुन्हा आपल्याच प्रभागात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, 'पुन्हा येईन'ची स्वप्न पाहणाऱ्या काही माजी नगरसेवकांना आपला खेळ बिघडण्याची धास्ती वाटू लागली आहे.
advertisement
येणाऱ्या मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांसाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणारी प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रभाग आरक्षणाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भाग आरक्षणाची सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार आहे. या अधिसूचनेनुसार, मुंबईतील प्रभागांमध्ये अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय (OBC), महिला आणि खुला प्रवर्ग या वर्गवारीनुसार आरक्षण ठरवले जाणार आहे.
advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 जागा, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 61 जागा राखीव असणार आहे. त्याशिवाय, अनुसूचित जमाती, महिला आणि खुला प्रवर्ग मिळून एकूण 17 जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. मुंबईची एकूण लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 42 हजार 373 इतकी आहे. तर अनुसूचित जातींची लोकसंख्या 8 लाख 3 हजार 236 इतकी आहे. अनुसूचित जमातींची लोकसंख्या 1 लाख 29 हजार 652 इतकी आहे. तर प्रत्येक प्रभागात सरासरी लोकसंख्या 54 हजार 854 इतकी आहे.
advertisement
या प्रक्रियेनंतर, सर्वसामान्य गटातील प्रभागांपैकी प्रथम महिला प्रवर्गासाठी आरक्षण काढले जाईल आणि उर्वरित प्रभाग खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले जाणार आहेत. येत्या आठवड्यात प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष सोडत प्रक्रिया पार पडेल. चक्राकार पद्धती लागू केल्यामुळे सध्याचे अनेक आरक्षित प्रभाग बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे राजकीय गणित नव्याने मांडले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. काही माजी नगरसेवकांना दुसऱ्या वॉर्डमध्ये आसरा शोधावा लागणार आहे. तर, काहींना पुन्हा नव्या संधीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
advertisement

प्रभाग आरक्षण कसं दिलं जाणार?

मुंबईत चक्रानुक्रमे आरक्षण निघत असताना 2007, 2012, 2017 मध्ये उतरत्या क्रमानुसार देण्यात आले. तर 2007 मध्ये जे प्रभाग आरक्षित होते ते वगळून पुढच्या प्रभागांमध्ये आरक्षण देण्यात आलं होते. एकूण लोकसंख्येत अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या किती आहे ते पाहून त्याचे एकूण लोकसंख्येशी गुणोत्तर काढून या गुणोत्तरावरून हे आरक्षण ठरते.
advertisement

मुंबईतील कोणते वॉर्ड आरक्षण होण्याची शक्यता?

चक्राकार आरक्षणामुळे कोणते वॉर्ड आरक्षित होणार, याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये अनुसूचित जातींसाठी 93, 118, 133, 140, 141, 146, 147, 151, 152, 155, 183, 186, 189, 199, 215 हे वॉर्ड आरक्षित होण्याची शक्यता आहे. तर अनुसूचित जमातींसाठी 59, 121 हे प्रभाग आरक्षित होण्याची शक्यता आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : 'पुन्हा येईन' म्हणणाऱ्या माजी नगरसेवकांना गेम होण्याची धास्ती, बीएमसी निवडणुकीबाबत मोठी अपडेट...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement