मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (3 ऑक्टोबर), शनिवारी (4 ऑक्टोबर) आणि पुन्हा शुक्रवार (10 ऑक्टोबर) रोजी ब्लॉक राहणार आहे. त्यामध्ये काही लोकल गाड्या रद्द होतील, काही गाड्या मधल्या स्थानकांवर थांबतील (शॉर्ट टर्मिनेशन) आणि काही गाड्या मधल्या स्थानकांवरून सुरू होतील (शॉर्ट ओरिजिनेशन). 3, 4 आणि 10 ऑक्टोबर रोजीच्या ब्लॉकबाबत सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
ब्लॉकची तारीख व कालावधी
03.10.2025 (शुक्रवार) सकाळी 11.20 ते सायं. 18.00 वाजेपर्यंत
04.10.2025 (शनिवार) सकाळी 11.20 ते सायं. 16.45 वाजेपर्यंत
10.10.2025 (शुक्रवार) सकाळी 11.20 ते सायं. 16.20 वाजेपर्यंत
6 हजार कोटी, 30 किमी रस्ता, देशातील हायटेक महामार्ग मुंबईला कनेक्ट होणार, वाचा कुठं आणि कधी?
ट्रॅफिक ब्लॉक विभाग :
भिवपुरी स्थानक – जांब्रुंग केबिन – ठाकूरवाडी – नागनाथ केबिन ते कर्जत
ब्लॉक कालावधीत उपनगरी गाड्यांचे नियोजन :
1) 03.10.2025 (शुक्रवार) रोजी नेरळ व कर्जत दरम्यान अप आणि डाउन उपनगरी सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
2) 04.10.2025 (शनिवार) आणि 10.10.2025 (शुक्रवार) रोजी कर्जत व खोपोली दरम्यान अप आणि डाउन उपनगरी सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
3) 03.10.2025 (शुक्रवार) — गाड्यांच्या वाहतुकीवरील परिणाम
उपनगरी गाड्या रद्द
खोपोली येथून 14.55 वाजता सुटणारी खोपोली - कर्जत उपनगरी ट्रेन रद्द करण्यात येईल.
उपनगरी गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 09.01, 09.30, 09.57 आणि 11.14 वाजता सुटणाऱ्या CSMT - कर्जत उपनगरी गाड्या नेरळपर्यंतच धावतील. या ठिकाणी त्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील. ठाणे येथून 12.05 वाजता सुटणारी ठाणे - कर्जत लोकल नेरळपर्यंत धावेल. CSMT येथून 12.20 वाजता सुटणारी CSMT - खोपोली लोकल नेरळ येथे, तर CSMT येथून 10.36 वाजता सुटणारी CSMT - कर्जत लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
उपनगरी गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन
कर्जत येथून 10.43, 11.19, 12.00, 13.00 आणि 13.55 वाजता सुटणाऱ्या कर्जत - CSMT लोकल गाड्या नेरळ येथून शॉर्ट ओरिजिनेट होतील.
कर्जत येथून 13.27 वाजता सुटणारी कर्जत - ठाणे लोकल नेरळ येथून शॉर्ट ओरिजिनेट होईल.
कर्जत येथून 12.23 वाजता सुटणारी कर्जत - CSMT लोकल अंबरनाथ येथून शॉर्ट ओरिजिनेट होईल.
3 ऑक्टोबर रोजी डाउन उपनगरी गाड्यांचे रद्दीकरण होणार नाही आणि मेल व एक्सप्रेस गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.
4 आणि 10 ऑक्टोबर रोजीच्या वाहतुकीवर परिणाम
डाउन उपनगरी गाड्या रद्द
कर्जत येथून 12.00, 13.15 आणि 15.39 वाजता सुटणाऱ्या कर्जत - खोपोली लोकल गाड्या रद्द.
अप उपनगरी गाड्या रद्द
खोपोली येथून 11.20, 12.40 आणि 14.55 वाजता सुटणाऱ्या खोपोली - कर्जत लोकल गाड्या रद्द.
उपनगरी गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन :
CSMT येथून 12.20 वाजता सुटणारी CSMT - खोपोली लोकल कर्जत येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
उपनगरी गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन
खोपोली येथून 13.48 वाजता सुटणारी खोपोली - CSMT लोकल कर्जत येथून शॉर्ट ओरिजिनेट केली जाईल. 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या धावण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान मेल, एक्सप्रेस तसेच उपनगरी गाड्यांच्या धावण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
विशेष सूचना
काही मेल व एक्सप्रेस गाड्या मंकी हिल केबिन येथे मिड-मार्गावर वळविण्यात येतील, परंतु याचा मुख्य ट्रॅकवरील गाड्यांच्या धावण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत.