Rashifal 2024: 3 मोठे ग्रह राहणार तुमच्यावर वर्षभर मेहरबान! या राशींना 2024 मध्ये अनपेक्षित लाभाच्या संधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Rashifal 2024 : प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. 2024 वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मानवी जीवनावर ग्रहांचा विशेष प्रभाव पडत असतो. सर्व ग्रह ठराविक काळानं आपली राशी बदलतात. ग्रहाच्या राशी बदलाबरोबरच अन्य ग्रहांसोबत संयोग, वक्री स्थिती, उदय आणि अस्त या राशी स्थिती होत राहतात. वर्षभरातील ग्रहांच्या स्थितीचा, बदलांचा सर्व लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो.
advertisement
1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व 9 ग्रहांचे विशेष महत्त्व आणि प्रभाव आहे. परंतु, शनी, गुरू आणि राहू-केतू यांचा लोकांच्या जीवनावर विशेष प्रभाव आहे. या ग्रहांची स्थिती शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम होतात. शनि, गुरू आणि राहू-केतू हे अतिशय संथ गतीने चालणारे ग्रह मानले जातात. शनीचा राशी बदल सुमारे अडीच वर्षांनी होतो, गुरूचा राशी बदल 13 महिन्यांनी होतो आणि राहू-केतू नेहमी व्रकी फिरतात आणि 18 महिन्यांनी राशी बदलतात.
advertisement
2/5
2023 मध्ये शनि, गुरू आणि राहू या तिन्ही ग्रहांनी आपली राशी बदलली आहे. सध्या शनी कुंभ राशीत, गुरू मेष राशीत आणि राहू मीन राशीत आहे. या तीन प्रमुख ग्रहांचे संक्रमण 2025 पर्यंत असेल राहील आणि त्यानंतर राशी परिवर्तन होईल. जाणून घेऊया नवीन वर्ष 2024 मध्ये या ग्रहांचा शुभ प्रभाव कोणत्या राशींवर दिसेल.
advertisement
3/5
मेष - वैदिक ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार मेष राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष खूप शुभ ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांवर गुरूचा विशेष प्रभाव राहील. मे 2024 पर्यंत गुरू मेष राशीत राहील, त्यानंतर शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरु ग्रह चढत्या घरात असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना 2024 मध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. नशिबाची साथ मिळाल्याने प्रत्येक कामात यश मिळेल. याशिवाय 11व्या भावात शनि असल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल.
advertisement
4/5
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष खूप चांगले जाणार आहे. तुमच्या राशीमध्ये, न्यायदेवता शनि महाराज कार्यक्षेत्रात असतील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात आणि करिअरमध्ये यश मिळण्याची चांगली शक्यता आहे. 2024 मध्ये तुम्हाला काही मोठे यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकता ज्यामुळे तुमच्या मान-सन्मान, प्रसिद्धी आणि संपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. भौतिक सुखसोयी मिळतील. व्यवसायात प्रगती होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील.
advertisement
5/5
सिंह - सिंह राशीच्या लोकांवर शनि, गुरू आणि राहूचा शुभ प्रभाव दिसून येईल. 2024 मध्ये तुम्ही खूप प्रगती आणि यश मिळवाल. शनिदेव तुमच्या राशीतून सप्तम भावात स्थित असेल. अशा स्थितीत जे कोणाशी तरी भागीदारी करून कोणताही व्यवसाय करत आहेत त्यांना त्यात अपार यश मिळेल. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी कठोर परिश्रमाचे वर्ष असेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. याशिवाय मे 2024 मध्ये बृहस्पति 10 व्या भावात असल्यामुळे भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळेल. राहू ग्रहाचा शुभ प्रभाव तुम्हाला अचानक आर्थिक लाभाची संधी देखील देईल. येणारे वर्ष कर्जमुक्तीचे वर्ष ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Rashifal 2024: 3 मोठे ग्रह राहणार तुमच्यावर वर्षभर मेहरबान! या राशींना 2024 मध्ये अनपेक्षित लाभाच्या संधी