TRENDING:

ShaniDev: साडेसाती नसली तरी अडीचकी या राशींना छळणार; एकामागोमाग एक संकटे पुढ्यात उभी

Last Updated:
Shani Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिची साडेसाती आणि शनिची अडीचकी (ढैय्या) हे दोन्ही शनीच्या ग्रहस्थितीमुळे येणारे महत्त्वाचे काळ आहेत. दोन्हीमध्ये व्यक्तीला काही प्रमाणात आव्हानांचा सामना करावा लागतो, पण त्यांचा कालावधी आणि परिणाम यात महत्त्वाचे फरक आहेत.
advertisement
1/5
साडेसाती नसली तरी अडीचकी या राशींना छळणार; एकामागोमाग एक संकटे पुढ्यात उभी
शनिच्या साडेसातीचा कालावधी साडेसात वर्षांचा असतो. हा सर्वात जास्त काळ चालणारा शनीचा प्रभाव आहे. जेव्हा शनी एखाद्या राशीच्या चंद्र राशीपासून बाराव्या, चंद्र राशीत आणि चंद्र राशीच्या दुसऱ्या घरातून भ्रमण करतो, तेव्हा त्या राशीला साडेसाती सुरू होते. साडेसातीचा काळ हा व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतो. या काळात व्यक्तीला आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
2/5
शनिच्या अडीचकीचा कालावधी नावाप्रमाणंच अडीच वर्षांचा असतो. साडेसातीच्या तुलनेत हा कालावधी खूप कमी आणि कमी त्रासाचा मानला जातो. जेव्हा शनी एखाद्या राशीच्या चंद्र राशीपासून चौथ्या किंवा आठव्या घरातून भ्रमण करतो, तेव्हा त्या राशीला अडीचकी सुरू होते.कंटक शनि (चौथ्या घरातील अडीचकी): जेव्हा शनी चंद्र राशीच्या चौथ्या घरातून जातो.अष्टम शनि (आठव्या घरातील अडीचकी): जेव्हा शनी चंद्र राशीच्या आठव्या घरातून जातो.
advertisement
3/5
अडीचकीचा प्रभाव साडेसातीपेक्षा कमी तीव्र असतो, परंतु तो देखील आव्हानात्मक असू शकतो. या काळात व्यक्तीला काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये अडचणी येऊ शकतात, आरोग्याच्या समस्या, आर्थिक चणचण, कामात अडथळे किंवा कौटुंबिक कलह. साडेसातीप्रमाणे संपूर्ण जीवनावर याचा मोठा परिणाम होतो असे नाही, तर काही विशिष्ट क्षेत्रांवर जास्त लक्ष केंद्रित होते.
advertisement
4/5
मार्च २०२५ नंतर (शनिच्या मीन राशीतील प्रवेशामुळे) अडीचकी सुरू झालेल्या राशीसिंह - या काळात सिंह राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या, अनपेक्षित खर्च, गुप्त शत्रूंकडून त्रास किंवा मानसिक ताण वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात. कोणतीही नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी प्रश्न निर्माण होऊ शकतात. अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रवासात आणि वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी.
advertisement
5/5
धनु - या काळात धनु राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते, म्हणजे कुटुंबात मतभेद किंवा आईच्या आरोग्याची चिंता. घर किंवा मालमत्तेशी संबंधित काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी स्थिरता कमी वाटू शकते. मानसिक अशांतता आणि अनावश्यक चिंता वाढू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: साडेसाती नसली तरी अडीचकी या राशींना छळणार; एकामागोमाग एक संकटे पुढ्यात उभी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल