TRENDING:

ShaniDev: वर्ष 2027 पर्यंत या दोन राशींची अडीचकी पाठ सोडणार नाही; नुकसानाची तयारी ठेवा

Last Updated:
ShaniDev: शनिची साडेसाती आणि अडीचकी या दोन्ही स्थितींना भारतीय ज्योतिषशास्त्रात खूप मोठं आणि महत्त्वाचं स्थान आहे. या दोन्ही अवस्थांमध्ये शनि एका व्यक्तीच्या जीवनात सुमारे साडेसात (साडेसाती) किंवा अडीच (अडीचकी) वर्षे राहून त्याला त्याच्या कर्माचे फळ देतो आणि जीवनात मोठे बदल घडवून आणतो.
advertisement
1/5
वर्ष 2027 पर्यंत या दोन राशींची अडीचकी पाठ सोडणार नाही; नुकसानाची तयारी ठेवा
साडेसाती म्हणजे काय? जेव्हा शनि ग्रह चंद्राच्या राशीच्या बाराव्या, राशीत स्वतः आणि दुसऱ्या या तीन राशींमधून क्रमाने भ्रमण करतो, तेव्हा त्या राशीला साडेसाती सुरू होते. शनीला एका राशीतून प्रवास करायला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे या तीन राशीतून भ्रमण पूर्ण करण्यासाठी त्याला साडेसात वर्षांचा कालावधी लागतो, म्हणून याला साडेसाती म्हणतात.
advertisement
2/5
ज्योतिषीय महत्त्व: साडेसातीचा काळ म्हणजे व्यक्तीच्या मागील कर्मांची परीक्षा घेण्याचा काळ मानला जातो. शनि या काळात व्यक्तीला त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचे फळ देतो. हा काळ संघर्ष, कष्ट आणि आव्हाने घेऊन येतो. जीवनात अनेक अडथळे येतात, ज्यामुळे व्यक्तीला धीर, सातत्य आणि प्रामाणिकपणा शिकायला मिळतो.
advertisement
3/5
शनिची अडीचकी (ढैय्या) जेव्हा शनि ग्रह चंद्राच्या राशीच्या चौथ्या किंवा आठव्या स्थानातून भ्रमण करतो, तेव्हा त्या स्थितीला अडीचकी किंवा शनि ढैय्या म्हणतात. ही स्थिती सुमारे अडीच वर्षांसाठी असते. अडीचकीच्या काळात जीवनात अस्थिरता वाढते आणि कोणतेही काम लवकर पूर्ण होत नाही. अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता या काळात विकसित होते.
advertisement
4/5
मार्च 2025 मध्ये शनिने मीन राशीत प्रवेश केला असल्यामुळे सध्या दोन राशींवर शनिची अडीचकी सुरू झाली आहे. सिंह (Leo): मीन राशी सिंह राशीच्या आठव्या स्थानात येते, म्हणून अडीचकी सुरू आहे. धनु (Sagittarius): मीन राशी धनु राशीच्या चौथ्या स्थानात येते, म्हणून अडीचकी सुरू आहे.
advertisement
5/5
या दोन्ही राशींवर पुढील अडीच वर्षे 2027 पर्यंत शनिची अडीचकी सुरू राहील. 'शनिची अडीचकी' ही अडीच वर्षांसाठी असते. शनिची साडेसाती' ही साडेसात वर्षांसाठी असते. सध्या मेष, कुंभ आणि मीन या राशींवर साडेसाती सुरू आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: वर्ष 2027 पर्यंत या दोन राशींची अडीचकी पाठ सोडणार नाही; नुकसानाची तयारी ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल