TRENDING:

Astrology: शुक्र साथ सोडतोय म्हणजे पैसा जाणार! या 3 राशीच्या लोकांवर आता वाईट दिवस आल्यात जमा

Last Updated:
Astrology: २० जुलैपासून शुक्र ग्रहाचे नक्षत्र बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, संपत्ती, आनंद इत्यादींचा कारक मानला जातो. शुक्र आता मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे, या बदलामुळे काही राशींना नशिबाची साथ मिळेल आणि काही राशींना त्रास सोसावा लागेल. शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींच्या अडचणी वाढतील, त्याविषयी जाणून घेऊया. 
advertisement
1/5
शुक्र साथ सोडतोय म्हणजे पैसा जाणार! 3 राशीच्या लोकांवर आता वाईट दिवस आल्यात जमा
ज्याप्रमाणे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात (याला राशी परिवर्तन किंवा गोचर म्हणतात), त्याचप्रमाणे ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतात. यालाच ग्रहांचे नक्षत्र बदल किंवा नक्षत्र गोचर असे म्हणतात.
advertisement
2/5
आकाश मंडलाचे एकूण २७ भागांमध्ये विभाजन केलं आहे आणि प्रत्येक भागाला नक्षत्र असे म्हणतात. ही नक्षत्रे चंद्राच्या आकाशातील भ्रमणावर आधारित आहेत, कारण चंद्र एका नक्षत्रात साधारणपणे एक दिवस राहतो. प्रत्येक नक्षत्र साधारणपणे १३ अंश २० कला (मिनिटे) एवढ्या व्याप्तीचे असते.
advertisement
3/5
मिथुन - शुक्र ग्रहाच्या स्थितीतील बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना करिअरमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, काही लोकांचे जुळून येत असलेलं लग्न अचानक मोडू शकतं. मिथुन राशीच्या व्यावसायिकांना नुकसान होऊ शकते. यासोबतच आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. या काळात खर्च वाढू देऊ नका, त्यावर नियंत्रण ठेवा.
advertisement
4/5
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा नक्षत्र बदल खराब परिणाम करणारा ठरू शकतो. समाजात तुमची बदनामी होऊ शकते, विशेष म्हणजे लोकांमध्ये बोलताना थोडा संयम ठेवा. वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. नक्षत्र बदलामुळे पोटात आणि जबड्यात वेदना होऊ शकतात. याशिवाय तुमची बचतही वाया जाऊ शकते.
advertisement
5/5
धनु - या नक्षत्र बदलामुळे धनु राशीच्या लोकांना शिक्षण क्षेत्रात अडचणी येऊ शकतात. तुमचे आरोग्य बिघडू शकते. जोडीदाराशी वाद घालण्याऐवजी संबंध सुधारण्याचे काम केले पाहिजे, अन्यथा तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर जाऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: शुक्र साथ सोडतोय म्हणजे पैसा जाणार! या 3 राशीच्या लोकांवर आता वाईट दिवस आल्यात जमा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल