ShaniDev: त्रास इतक्यात संपेल कसा? वर्ष 2027 पर्यंत या 2 राशींच्या मागे शनिच्या अडीचकीचे भोग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: ज्योतिषशास्त्रात शनिच्या स्थितीला फार महत्त्व दिलं आहे. शनिची थोडी हालचालसुद्धा राशीचक्रावर मोठा प्रभाव दाखवते. कर्मफळदाता शनिदेव एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतात आणि या काळात कोणत्या ना कोणत्या राशींवर साडेसाती (7.5 वर्षांचा काळ) आणि अडीचकी (2.5 वर्षांचा काळ) यांचा प्रभाव दिसून येतो. ज्या राशींवर शनिच्या या दोन दशा सुरू असतात, त्यांना शनिदेव सरळ मार्गावर आणतात. म्हणजे शनिदोषांना वाईट समजलं जात असलं तरी साडेसाती अडीचकीमध्ये व्यक्तिला आपलं आणि परकं कोण यातील फरक कळू लागतो, आयुष्या अर्थ उमगतो.
advertisement
1/6

पुढील पाच वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत काही राशींवर शनिची अडीचकी (ढैय्या) आणि साडेसाती सुरू राहणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना खडतर काळ आणि आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते.
advertisement
2/6
शनिची अडीचकी (2.5 वर्षांचा काळ)29 मार्च 2025 रोजी शनिदेवाने कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश केला. मीन रास ही सिंह राशीपासून आठव्या स्थानात असल्यामुळे, याच दिवसापासून सिंह राशीवर शनिची अडीचकी सुरू झाली आहे. हा काळ 3 जून 2027 पर्यंत राहील.
advertisement
3/6
29 मार्च 2025 रोजी शनिदेवाने कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश केला आहे. मीन रास ही धनु राशीपासून चौथ्या स्थानात असल्यामुळे, याच दिवसापासून धनु राशीवर शनिची अडीचकी सुरू झाली आहे. हा काळ 3 जून 2027 पर्यंत राहील.
advertisement
4/6
शनिची साडेसाती (7.5 वर्षांचा काळ)मीन राशी: 29 मार्च 2025 रोजी शनिने कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश केला. त्यामुळे मीन राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. हा काळ साधारणपणे 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत असेल.
advertisement
5/6
कुंभ राशी: कुंभ राशीवर साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू राहील, जो 29 मार्च 2025 रोजी सुरू झाला असून 2028 पर्यंत असेल.
advertisement
6/6
मेष राशी: मेष राशीवर 29 मार्च 2025 पासून शनिची साडेसाती सुरू झाली. ही साडेसाती 31 मे 2032 पर्यंत राहील. मेष राशीच्या लोकांना आता भरपूर काळ साडेसातीचा सामना करावा लागणार आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: त्रास इतक्यात संपेल कसा? वर्ष 2027 पर्यंत या 2 राशींच्या मागे शनिच्या अडीचकीचे भोग