Astrology: ही तर बिकट काळाची सुरुवात! या राशीला पुढं आणखी सोसावं लागणार, आरोग्याकडे दुर्लक्ष नको
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्च रोजी शनि गोचर झाले. अडीच वर्षांनी शनिचे राशीपरिवर्तन झाले, सूर्यग्रहण लागलेलं असताना शनिचे राशी परिवर्तन झाले आहे. 29 मार्च रोजी सूर्यग्रहण आणि शनीच्या गोचराचा योगायोग अत्यंत दुर्मीळ मानला जातो, याचा काही राशींना जोरदार फटका बसणार आहे.
advertisement
1/5

सूर्यग्रहण मीन राशीत झाले आणि 29 मार्चपासून सूर्य आणि शनीची युती मीन राशीत सुरू झाली आहे. मीन राशीत दोन शत्रू ग्रहांचा संयोग जुळून येणं खूप धोकादायक असून त्याचा वाईट परिणाम मीन राशीवर होऊ शकतो.
advertisement
2/5
शनिने मीन राशीत प्रवेश केल्यानं साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून तो सर्वात वेदनादायक मानला जातो. या टप्प्यात व्यक्तीला शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रासांना तोंड द्यावे लागते. पैशाचे नुकसान, आजारपण आणि अपघात होण्याची शक्यता असते, तसेच प्रगतीमध्ये अडचणी येत राहतात.
advertisement
3/5
एकंदरीत, या तीन विचित्र परिस्थितींमुळे मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ कठीण असेल. 14 एप्रिलपर्यंत सूर्य मीन राशीत राहील आणि शनीच्या युतीत असेल. या काळात काळजीपूर्वक वागा. कोणत्याही वादात पडू नका, अन्यथा लोकांशी संघर्ष होऊ शकतो. गुंतवणूक टाळा. अहंकार टाळा.
advertisement
4/5
अडीच वर्षे सावधगिरी बाळगा - साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात, पैशांची गुंतवणूक हुशारीने करा. या काळात जर कुंडलीत अशुभ ग्रहांची दशा किंवा अंतरदशा चालू असेल, तर व्यक्ती मोठी स्वप्ने पाहू लागते आणि स्वप्नांच्या जगात हरवून जाते, त्यांना प्रत्यक्ष जगाचे भान राहत नाही. वास्तवाच्या आधारावर काम करणे गरजेचे आहे.
advertisement
5/5
शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी हनुमान चालीसा वाचा. हनुमानाची पूजा केल्याने शनीच्या प्रभावापासून संरक्षण होते. शनिवारी, पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून दिवा लावा. गरिबांना मदत करा. कोणतेही चुकीचे काम करू नका, अन्यथा शनि तुम्हाला कठोर शिक्षा करेल. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सहामुखी रुद्राक्ष घालू शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: ही तर बिकट काळाची सुरुवात! या राशीला पुढं आणखी सोसावं लागणार, आरोग्याकडे दुर्लक्ष नको