Astrology: खड्ड्यात निघालंय सगळं असं वाटत असताना..! या 5 राशींचे आता चमकणार नशीब; पुन्हा भाग्याची संधी
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 03, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12

मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांना बुधवारी दिवसभर चढ-उतार जाणवेल. कामासाठी बरीच धावपळ होईल. घरापासून दूर जावं लागू शकतं. प्रवासाचे योग आहेत. सतत खर्च वाढत असल्यानं काळजी वाटेल. अनावश्यक खर्च त्रासदायक ठरतील. कामासाठी दिवस चांगला आहे. काम नीट समजून घेतल्यास ते यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. जोडीदार रागावल्याने तुम्हाला त्रास जाणवेल. प्रेम जीवनात दिवस रोमँटिक असेल. आरोग्याची काळजी घ्या.Lucky Color : YellowLucky Number : 4
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : वृषभेच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस चांगला आहे. कामासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमचं उत्पन्न वाढेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात रोमान्सचा अनुभव घ्याल. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. प्रेम जीवनात वाद होऊ शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा. अनपेक्षित लाभ मिळू शकतात.Lucky Color : GreenLucky Number : 17
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : कधी नव्हे ते कुटुंबातील लोक तुम्हाला मदत करतील. त्यामुळे तुम्ही चांगले काम करू शकाल. मालमत्तेशी संबंधित गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. खूप दिवसांपासून अडकलेल्या कामात यश मिळेल. उत्पन्नात काहीशी घट होईल. खर्च वाढू शकतो. मनात काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात चढ-उतार जाणवेल. जोडीदार तुमच्याशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करेल.Lucky Color : Sky BlueLucky Number : 11
advertisement
4/12
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस मध्यम फळदायी असेल. सकाळपासून एखादी चिंता सतावेल. पण, संध्याकाळी चिंता कमी होईल. नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला काही चांगले प्रस्ताव मिळू शकतात. त्यातून तुम्हाला फायदा होईल. उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. प्रेम जीवनात असलेल्या व्यक्ती जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करतील. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता किंवा काही प्लॅन होईल.Lucky Color : BrownLucky Number : 16
advertisement
5/12
सिंह (Leo) : सिंहेच्या लोकांना बुधवारी दिवसभर चढ-उतार जाणवेल. एखाद्या गोष्टीची जास्त काळजी सतावेल. पण त्रास करून घेणं तुमच्यासाठी चांगलं नाही, कारण यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. कामाशी संबंधित गोष्टींमध्ये ठाम राहा. तुमचा विचार तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा ठरवेल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. लव्ह लाईफसाठी दिवस चांगला आहे. जोडीदार विशेष काम करेल.Lucky Color : PinkLucky Number : 6
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आपल्यासाठी बुधवार मध्यम फलदायी असेल. प्रतिकूल ग्रह स्थितीमुळे तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागेल. तुमची काळजी देखील वाढेल. पण तुम्ही बुध्दिमत्तेच्या जोरावर आनंदाचे क्षण शोधाल. प्रेम जीवन समाधानकारक असेल. तुमची जोडीदाराशी जवळीक असेल. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. जोडीदार रागाच्या भरात वाईट बोलू शकतो. तुम्ही शांत रहा. सर्वकाही ठीक होईल. कामासाठी दिवस चांगला आहे. आरोग्य चांगले राहील. जुने मित्र मदत करतील.Lucky Color : Dark GreenLucky Number : 7
advertisement
7/12
तूळ (Libra) : तूळ राशीच्या लोकांना अनपेक्षित खुशखबर मिळेल, मुलांमुळे आनंद मिळेल. ते त्यांचे विचार तुमच्याशी शेअर करतील. यामुळे आपापसातील प्रेम वाढेल. विवाहित व्यक्ती कौटुंबिक गोष्टींमुळे चिंतेत राहतील. जोडीदाराशी असलेला समन्वय बिघडेल. लव्ह लाईफमधील व्यक्ती सर्जनशीलतेच्या जोरावर प्रिय व्यक्तीसाठी काही खास करण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबाची स्थिती चांगली राहील. आरोग्य उत्तम असेल. उत्तम आहारामुळे मन प्रसन्न असेल. कामात चढ-उतार जाणवेल.Lucky Color : BlueLucky Number : 3
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : बुधवारचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. कुटुंबाकडे अधिक लक्ष देऊ शकाल. घरातील प्रलंबित कामं पूर्ण होतील. कामासाठी दिवस अनुकूल आहे. कामाकडे पुरेसे लक्ष द्याल. जीवनात चांगला समन्वय दिसेल. कुटुंबाची साथ मिळेल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. जोडीदाराशी छान चर्चा होईल. जोडीदार तुमच्यासाठी खास गोष्ट करेल, ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. लव्ह लाइफमधील व्यक्ती त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे जोडीदारापासून दूर जातील.Lucky Color : Navy BlueLucky Number : 11
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : बुधवारचा दिवस छान आहे, प्रामाणिकपणा दाखवण्याची संधी मिळेल. घरात सुख-शांती असेल. घरात एखाद्या शुभ कार्याबद्दल चर्चा होईल. प्रेम जीवनातील व्यक्ती आनंदी असतील. जोडीदाराशी जवळीक असेल. विवाहित व्यक्ती कौटुंबिक जीवनात जोडीदाराच्या अक्टिव्हिटींमुळे आनंदी असतील. जोडीदार कौटुंबिक कामात मदत करेल. खर्च कमी असेल. उत्पन्न ठीक राहील. कामाच्या बाबतीत खूप मेहनत कराल.Lucky Color : BlackLucky Number : 9
advertisement
10/12
मकर (Capricorn) : चांगला आणि अनुकूल दिवस आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणात फायदा होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधाल. ते तुम्हाला महत्त्वाच्या कामात मदत करतील. तुमच्या मनात इतरांचं भलं करण्याची इच्छा असेल. कौटुंबिक जीवनात शांतता असेल. प्रेम जीवनाचा आनंद घ्याल. उत्पन्न वाढेल, खर्च कमी होईल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.Lucky Color : PurpleLucky Number : 18
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आज आपल्यासाठी कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. जमीन किंवा मालमत्ता खरेदीबाबत घरात चर्चा होऊ शकते. शुभ कार्यासाठी खर्च कराल. उत्पन्न चांगले राहील. कामाकडे थोडे अधिक लक्ष द्यावे लागेल. मन विचलित असल्याने कामात अडचणी येऊ शकतात. कौटुंबिक जीवनात जिव्हाळा असेल. जोडीदार तुमच्या फायद्याचे माध्यम बनू शकतो. तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतो. लव्ह लाईफमध्ये मनातल्या गोष्टी अनपेक्षित जिभेवर असतील. दिवसाचा पुरेपूर आनंद घ्याल.Lucky Color : MagentaLucky Number : 12
advertisement
12/12
मीन (Pisces) : आजचा दिवस लकी असू शकतो, कामाचे रिझल्ट चांगले मिळतील. तुमची स्थिती चांगली असेल. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही रागावू शकता. त्यामुळे दुपारी तुमचे मन उदास राहील. परिणामी, वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. लव्ह लाइफमधील व्यक्ती आनंदी आणि समाधानी असतील. तुम्हाला वडिलांकडून सहकार्य मिळेल.Lucky Color : OrangeLucky Number : 2
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: खड्ड्यात निघालंय सगळं असं वाटत असताना..! या 5 राशींचे आता चमकणार नशीब; पुन्हा भाग्याची संधी