फॉर्च्युनर आता विसरा, Mahindra ने लाँच केली 7 सीटर धाकड SUV, फिचर्स दमदार अन् किंमतही कमी
- Published by:Sachin S
Last Updated:
महिंद्राने अखेरीस Mahindra xuv 7xo या ७ सीटर एसयूव्हीचं दमदार लाँचिंग केलं आहे. ही नवी एसयूव्ही महिंद्रा XUV 700 चं फेसलिफ्ट व्हर्जन आहे. यामध्ये बरेच बदल करण्यात आले आहे.
advertisement
1/12

भारतातील दमदार आणि मजबूत अशी वाहन उत्पादक कंपनी म्हणून ओळख असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा मोटर्सने वर्षाच्या सुरूवातीला धमाका केला आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली XUV 7XO वरून अखेर पडदा बाजूला केला आहे. Mahindra xuv 7xo भारतात अखेरीस लाँच झाली आहे. खरंतर ही XUV 700 या SUV चं हे फेसलिफ्ट मॉडेल आहे. Mahindra xuv 7xo ची किंमत 13.66 लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होणार आहे.
advertisement
2/12
महिंद्राने अखेरीस Mahindra xuv 7xo या ७ सीटर एसयूव्हीचं दमदार लाँचिंग केलं आहे. ही नवी एसयूव्ही महिंद्रा XUV 700 चं फेसलिफ्ट व्हर्जन आहे. यामध्ये बरेच बदल करण्यात आले आहे.
advertisement
3/12
बाहेरील डिझाईन आणि अंतर्गत इंटिरिअरमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. समोरील लूकही बदलला आहे. Mahindra xuv 7xo मध्ये समोर नवीन डिझाईनर ग्रील दिली असून ज्यामध्ये ८ उभे स्लॅट्स आहे.
advertisement
4/12
Mahindra xuv 7xo च्या बंपरचंही नवीन डिझाइन केलं आहे. यामध्ये इंटिग्रेटेड स्किड प्लेट आहे. तसंच अपडेटेड LED हेडलॅप्स,आणि डे टाइम LED DRLs दिले आहे. इंडिकेटर लँप्स आणि रिवाइज्ड फॉग लॅम्प हे असेंम्बल करता येणार आहे.
advertisement
5/12
Mahindra xuv 7xo ला बाजूने पाहिलं तर सेम XUV700 सारखीच आहे. फक्त यामध्ये १९ इंचाचे अलॉय व्हिल्स दिले आहे. मागे SUV मध्ये कनेक्टेड LED टेललॅप्स दिले असून सोबतच एक ब्लॅक एप्लिक दिली आहे.
advertisement
6/12
खरंतर महिंद्रा XUV 7XO मधील फिचर्स हे अपग्रेड्स इंटीरिअर केले आहे जे महिंद्रा XEV 9e आणि 9S मॉडेलला समोर ठेवून केले आहे.
advertisement
7/12
Mahindra xuv 7xo मध्ये आता बेस मॉडेलपासून ट्रिपल स्क्रीन सेटअप दिलाा आहे. जो 12.3-इंचा सेंट्रल टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 12.3-इंचाचे ड्रायव्हर डिस्प्ले आणि 12.3-इंचाचा एंटरटेनमेंट स्क्रीन फ्रंट पॅसेंजर साठी दिला आहे.
advertisement
8/12
Mahindra xuv 7xo मध्य दो-स्पोक, फ्लॅट-बॉटम, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हिल दिले आहे. ज्यामध्ये माउंटेड कंट्रोल्स आहे. अपग्रेडेड ADRENOX+ सिस्टम, 16-स्पीकर हार्मन कार्डन ऑडिओ सिस्टमसह डॉल्बी एटमॉस, आणि फ्रंट सीट्सलाा मागे BYOD (ब्रिंग योर ओन डिवाइस) पोर्ट्स दिले आहे.
advertisement
9/12
Mahindra xuv 7xo सेफ्टीसाठी ADAS लेव्हल २ चं सेटअप दिलं आहे. Mahindra xuv 7xo ची क्रॅश टेस्ट घेण्यात आली होती. यामध्ये Mahindra xuv 7xo ला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
advertisement
10/12
Mahindra xuv 7xo मध्ये काही स्मार्ट फिचर्सही दिले आहे. यामध्ये 540-डिग्री सराउंड व्हू कॅमेरा, ड्युल-जोन क्लाइमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड सीट्स, फ्रंट सीट्ससाठी पावर्ड ‘बॉस मोड’, ऑटो डिमिंग IRVM,
advertisement
11/12
Mahindra xuv 7xo मध्ये ड्रायव्हर सीटसाठी मेमोरी फंक्शनसोबत पावर्ड फ्रंट सीट्स, कूल्ड ग्लव बॉक्स, पॅनारिमिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, सेकंड-रो पॅसेंजर्ससाठी डेडिकेटेड वायरलेस चार्ज, इंटिग्रेटेड विंडो ब्लाइंड्स सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
12/12
Mahindra xuv 7xo मध्ये AX, AX3, AX5,AX7, AX7T, आणि AX7L असे व्हेरियंट दिले आहे. यामध्ये AX हे बेस मॉडेल आहे. पेट्रोल व्हेरियंटची किंमत 13.66 लाखांपासून सुरू होते. तर डिझेल मॉडेलची किंमत १४.९६ लाख इतकी आहे. यामध्ये टॉप मॉडेल AX7L ही २४.९२लाख एक्स शोरूम दिल्ली इतकी किंमत ठेवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
फॉर्च्युनर आता विसरा, Mahindra ने लाँच केली 7 सीटर धाकड SUV, फिचर्स दमदार अन् किंमतही कमी