TRENDING:

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच

Last Updated:
7 Best Thriller Web Series on Prime Video: प्राइम व्हिडिओ हे फक्त कॉमेडी किंवा फॅमिली ड्रामा साठी नाही, तर जबरदस्त थ्रिलर सिरीज साठीही प्रसिद्ध आहे.
advertisement
1/8
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
प्राइम व्हिडिओ हे फक्त कॉमेडी किंवा फॅमिली ड्रामा साठी नाही, तर जबरदस्त थ्रिलर सिरीज साठीही प्रसिद्ध आहे. इथल्या सिरीजमध्ये सस्पेन्स, गुन्हेगारी, रहस्य, आणि अप्रत्याशित ट्विस्टचं असे मिश्रण आहे की तुम्ही पहिला एपिसोड लावलात की थेट शेवटपर्यंत बघत बसाल.
advertisement
2/8
मिर्झापूर: पंकज त्रिपाठीचा "कालीन भैया" तुम्ही एकदा पाहिलात की विसरणं अशक्य. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या काल्पनिक शहरात सत्तेचा, हिंसेचा आणि बदलेचा खेळ रंगतो. अली फजल आणि विक्रांत मेस्सी यांनी आपल्या अभिनयाने सीरिजला वेगळ्याच उंचीवर नेलं आहे.
advertisement
3/8
पाताल लोक: जयदीप अहलावतचा हाथीराम चौधरी पोलिस अधिकारी म्हणून अप्रतिम कामगिरी करतो. ही सिरीज फक्त थ्रिलर नाही, तर समाजाच्या वेगवेगळ्या थरांचं (स्वर्ग लोक, धरती लोक, पाताळ लोक) भेदक चित्रण आहे.
advertisement
4/8
द फॅमिली मॅन: मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी म्हणजे एकदम सुपरकूल एजंट. तो दिवसात ऑफिस कर्मचारी, आणि रात्री दहशतवाद्यांचा पाठलाग करणारा सीक्रेट एजंट आहे. त्याचं वैवाहिक आयुष्य आणि देशासाठीचा संघर्ष दोन्ही पाहताना भावनांचा गुंता निर्माण होतो.
advertisement
5/8
ब्रीद: एक वडिलांचा आपल्या मुलासाठीचा आत्यंतिक प्रेमभाव कसा भयानक रूप घेतो, हे “ब्रीद” दाखवते. पहिल्या सिझनमध्ये आर. माधवनची सायकॉलॉजिकल बाजू बघायला मिळते, तर दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चन एक अनपेक्षित ट्विस्ट देतो. या सिरीजमधील सस्पेन्स इतका घट्ट आहे की श्वास रोखून ठेवावा लागतो.
advertisement
6/8
दहाड: सोनाक्षी सिन्हा पहिल्यांदाच पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसली. अंजली भाटी म्हणून ती अनेक महिलांच्या मृत्यूंच्या प्रकरणाची चौकशी करते. पण या आत्महत्या आहेत की कुणाचं काळजीपूर्वक आखलेलं षडयंत्र? ही सिरीज पाहताना तुम्हाला “किलर कोण?” या प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत मिळत नाही.
advertisement
7/8
फर्जी: शाहिद कपूरचा डिजिटल डेब्यू म्हणजे धमाका. तो एक प्रतिभावान स्केच आर्टिस्ट आहे, पण परिस्थितीमुळे तो बनावट नोटा छापण्याच्या दलदलीत शिरतो. विजय सेतुपतीचा पोलीस अधिकारी आणि के.के. मेननचा गुन्हेगारी किंग दोघांची टक्कर होते.
advertisement
8/8
द लास्ट अवर: ही सिरीज थ्रिलरसोबत अलौकिक तत्वांचं अनोखं मिश्रण आहे. संजय कपूर आणि शमन एकत्र येऊन एका रहस्यमय प्रकरणाचा तपास करतात. उत्तर-पूर्व भारताचं सौंदर्य, पारंपरिक श्रद्धा आणि सस्पेन्स याचं सुंदर मिलाफ आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल