ना भांडण ना लफडी, 3 वर्षातच मोडला अभिनेत्याचा संसार; कुत्रा ठरला कारण, कसा काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Actor Divorce : सध्या अनेक सेलिब्रेटी डिवोर्स घेत आहेत. पण काही वर्षांआधी एका अभिनेत्याचा डिवोर्स झाला त्याच्या डिवोर्सचं कारण त्याच्या घरातील कुत्रे ठरले. पण कसं काय?
advertisement
1/10

बॉलिवूड नाही तर आता मराठी इंडस्ट्रीतही अनेक कलाकार मंडळी डिवोर्स घेत आहेत. मधल्या काळात कलाकारांच्या डिवोर्सचा सिलसिला चांगलाच रंगला होता. कोणी लग्नाच्या 17 वर्षांनी तर कोणी 5 वर्षातच वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काही मतभेद, मनभेद असल्याने त्यांनी सामंजस्यांनी हा निर्यण घेतला.
advertisement
2/10
पण बॉलिवूडचं असं एक कपल ज्यांच्यात कोणतेच मतभेद, हेवेदावे नव्हते. दोघांचे बाहेर अफेअरही नाही. सगळं काही छान आणि आलबेल, तरी त्यांनी डिवोर्स घेतला आणि त्यांच्या डिवोर्सचं कारण बनला एक कुत्रा. या कपलबरोबर नेमकं घडलं तरी काय?
advertisement
3/10
सेलिब्रिटींचे डिवोर्स सहसा विवाहबाह्य संबंधांमुळे किंवा परस्पर मतभेदांमुळे होतात. पण या अभिनेत्याचा डिवोर्स त्यांच्या कुत्र्यांमुळे झाला. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना!
advertisement
4/10
अभिनेता अरुणोदय याने 13 डिसेंबर 2016 रोजी कॅनडाच्या ली एल्टन हिच्यासोबत लग्न केलं. दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. पण लग्नाच्या तीन वर्षातच 2019 ला दोघांचा डिवोर्स झाला.
advertisement
5/10
अरुणोदय प्राणी प्रेमी आहे. त्याला कुत्रे पाळण्याची खूप आवड आहे. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर कुत्र्यांसह अनेक फोटो देखील आहेत. लग्नानंतर ली एल्टनला त्याच्या कुत्र्यांच्या आवाजाने त्रास होऊ लागला ज्यामुळे दोघांमध्ये काही वाद झाले.
advertisement
6/10
कुत्र्यांच्या भांडणामुळे आणि सतत भुंकण्यामुळे ली एल्टन खूप अस्वस्थ होऊ लागली. यामुळे पती-पत्नीमध्ये दररोज वाद होऊ लागले आणि त्यांच्या नात्यात तणाव वाढला.
advertisement
7/10
कुत्र्यांवरून सुरू झालेले भांडण इतकं वाढलं की अखेर अरुणोदय सिंगने डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फॅमिली कोर्टात डिवोर्ससाठी अर्ज दाखल केला. 2019मध्ये दोघे ऑफिशिअली वेगळे झाले.
advertisement
8/10
अरुणोदयचा घटस्फोट होऊन सहा वर्षे झाली आहेत परंतु त्याने अद्याप दुसरं लग्न केलेलं नाही. तो आता 42 वर्षांचा असून सिंगल आयुष्य जगतोय. डिवोर्सनंतर तो त्याची पर्सनलाइफ लाइमलाइटपासून दूर ठेवतो.
advertisement
9/10
अरुणोदयने 2009 मध्ये 'सिकंदर' चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर त्याने 'जिस्म 2', 'मैं तेरा हिरो', 'मिस्टर एक्स', 'ब्लॅकमेल' आणि 'मोहेंजो दारो' या चित्रपटांमध्ये काम केले.
advertisement
10/10
चित्रपटांव्यतिरिक्त त्याने ओटीटीवरही आपला ठसा उमटवला. ऑल्ट बालाजीच्या 'अपहरण' या वेब सिरीजमधील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. आता तो लवकरच 'श्रीमान' या चित्रपटात दिसणार आहे, जो 2016मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना भांडण ना लफडी, 3 वर्षातच मोडला अभिनेत्याचा संसार; कुत्रा ठरला कारण, कसा काय?