TRENDING:

17 व्या वर्षी डेब्यू, 43 व्या वर्षी अभिनय सोडून शिक्षणाकडे वळली अभिनेत्री!

Last Updated:
अनेक तरुण अभ्यास सोडून अभिनयात नशीब आजमावायला येतात. मात्र अशी एक अभिनेत्री जिने ग्लॅमरची दुनिया सोडून अभ्यासाचा मार्ग निवडला.
advertisement
1/7
17 व्या वर्षी डेब्यू, 43 व्या वर्षी अभिनय सोडून शिक्षणाकडे वळली अभिनेत्री!
स्वरूप संपत हे टीव्हीवरील प्रसिद्ध नाव होतं. अनेक मालिकांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांवर छाप सोडल्यानंतर या अभिनेत्रीने ग्लॅमरच्या दुनियेला रामराम ठोकला आणि अभ्यासाच्या वाटेवर निघाली.
advertisement
2/7
स्वरूप संपतने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 1979 मध्ये फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स म्हणून निवडून आली आणि मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं.
advertisement
3/7
मॉडेलिंगनंतर अभिनेत्रीने अभिनयाच्या जगात प्रवेश केला. स्वरूप संपत टीव्ही सीरियल 'ये जो है जिंदगी'मध्ये दिसली होती. या शोमधील तिच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केलं. प्रत्येक घराघरात ती एक प्रसिद्ध नाव बनली होती.
advertisement
4/7
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर ही अभिनेत्री मोठ्या पडद्याकडे वळली. तिने 'नरम गरम' आणि 'नखुदा' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
5/7
कारकिर्दीत स्वरूप संपतने 14 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय तिने 7 टीव्ही मालिकांमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती. 2019 च्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' आणि 2021 च्या 'द व्हाईट टायगर' या चित्रपटातही ती दिसली होती.
advertisement
6/7
1987 मध्ये अभिनेता परेश रावल यांच्याशी लग्न केल्यानंतर स्वरूप संपत अभिनयापासून दूर राहिली. वयाच्या 43 व्या वर्षी पीएचडी केली. त्यादरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून त्यांची निवड केली होती.
advertisement
7/7
परेश रावल पहिले स्वरूप संपतच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या पहिल्या भेटीनंतर अभिनेत्याने अभिनेत्रीला लग्नासाठी प्रपोज केले होते. 1987 पासून हे जोडपे सुखी वैवाहिक जीवन जगत असून त्यांना दोन मुलगे देखील आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
17 व्या वर्षी डेब्यू, 43 व्या वर्षी अभिनय सोडून शिक्षणाकडे वळली अभिनेत्री!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल