TRENDING:

Akash Thosar : वर्षभरापासून आकाश ठोसर गायब, अचानक झाला अ‍ॅक्टिव्ह, पोस्ट करत दिली मोठी अपडेट!

Last Updated:
Akash Thosar : एका वर्षापासून सोशल मीडियावरुन गायब असलेला आकाश ठोसल अचानक सक्रिय झाला. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मोठी अपडेट दिली आहे.
advertisement
1/8
वर्षभरापासून आकाश ठोसर गायब, अचानक झाला अ‍ॅक्टिव्ह, पोस्ट करत दिली मोठी अपडेट!
मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा 'सैराट'ने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. या सिनेमा आर्ची-परशा म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना एका रात्रीत स्टार बनवलं. पहिल्याच सिनेमात दोघांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली. तेव्हापासून दोघेही लाइफलाइटमध्ये आले.
advertisement
2/8
सैराटनंतर सर्वत्र आर्ची परशाचीच चर्चा पहायला मिळत होती. या सिनेमानंतर दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सोशल मीडियावरही दोघेही सक्रिय झाले. मात्र रिंकू राजगुरु जेवढी सक्रिय आहे तेवढा आकाश ठोसर सक्रिय नाहीये. गेल्या एक वर्षापासून तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही.
advertisement
3/8
एका वर्षापासून सोशल मीडियावरुन गायब असलेला आकाश ठोसल अचानक सक्रिय झाला. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मोठी अपडेट दिली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या आनंदच गगनात मावेनासा झालाय.
advertisement
4/8
आकाश ठोसर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तो रिंकू राजगुरुसोबत पुन्हा दिसणार आहे. 9 वर्षांनंतर त्यांचा ब्लॉकबस्टर सैराट सिनेमा री-रिलीज होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आर्ची-परशाची जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. पुन्हा त्यांच्या अफलातून केमेस्ट्री आस्वाद प्रेक्षकांना थिएटरमध्ये घेता येणार आहे.
advertisement
5/8
'सैराट'च्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. झी स्टुडिओजने 10 मार्च रोजी अधिकृत घोषणा करत सांगितले की, नागराज मंजुळे दिग्दर्शित हा गाजलेला चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये झळकणार आहे.
advertisement
6/8
आकाश ठोसरनेही त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सैराटच्या री-रिलीजची घोषणा केली. एक वर्षापासून सोशल मीडियावर पोस्ट न टाकलेला आकाश अचानक अॅक्टिव्ह झाला असून त्याने सैराटच्या री-रिलीजची पोस्ट शेअर करत चाहत्यांना मोठी अपडेट दिली आहे.
advertisement
7/8
21 मार्चपासून प्रेक्षकांना हा सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. री-री-रिलीजची घोषणा करत त्यांनी लिहिलं, '9 वर्षांनी पुन्हा एकदा सुटणार पिरतीचं वारं! सैराटची जादू पुन्हा अनुभवा, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 21 मार्चपासून.’
advertisement
8/8
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सैराट'ने मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला. हा मराठीतला पहिला १०० कोटींच्या पुढे कमाई करणारा चित्रपट ठरला. आर्ची आणि परशा यांची प्रेमकहाणी, नागराज मंजुळेंचे प्रभावी दिग्दर्शन, अजय-अतुल यांचे गाणे आणि दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Akash Thosar : वर्षभरापासून आकाश ठोसर गायब, अचानक झाला अ‍ॅक्टिव्ह, पोस्ट करत दिली मोठी अपडेट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल