'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं' म्हणत आली, उर्मिलाला दिली टक्कर; आता कुठे गायब आहे अभिनेत्री!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं म्हणत एक अभिनेत्री इंडस्ट्रीत आली. जिनं उर्मिला मातोंडकरला दिली टक्कर. 20 वर्षांपासून आहे गायब.
advertisement
1/8

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा नवख्या अभिनेत्रींची तुलना आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर केली जात होती. अशीच एक अभिनेत्री आली होती जिची तुलना थेट धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत करण्यात आली होती.
advertisement
2/8
इतकंच नाही तर ही अभिनेत्री दुसरी उर्मिला मातोंडकर आहे असंही म्हटलं गेलं होतं. पण मात्र आपल्या सिनेमांमधून प्रेक्षकांवर जादू करणं तिला काही जमलं नाही.
advertisement
3/8
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे अंतरा माळी. लोकप्रिय छायाचित्रकार जगदीश माली यांची मुलगी अंतरा माळी. हिनं 1998 मध्ये 'धूंधते रह जाओगे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती तेलुगू चित्रपट 'प्रेम कथा' आणि 1999 मध्ये 'मस्त' या हिंदी चित्रपटात दिसली.
advertisement
4/8
अंतरा माळी यांना हिंदी चित्रपटांमध्ये आणण्याचं श्रेय राम गोपाल वर्मा यांना जातं. त्यानंतर अभिनेत्रीनं दिग्दर्शकासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
5/8
अंताराने तिच्या कारकिर्दीत विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अभिषेक बच्चन आणि अक्षय कुमार सारख्या अनेक स्टार्ससोबत काम केलं. परंतु तिचा एकही चित्रपट प्रेक्षकांना मोहिनी घालू शकला नाही.
advertisement
6/8
'खिलाडी 429', 'रोड', 'डरना मना है', 'कंपनी', 'मैं माधुरी दीक्षित बन्ना चाहती हूं' सारख्या चित्रपटात तिनं काम केलं. पण तिचे हे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
advertisement
7/8
अभिनेत्री अंतरा माळी 2010 मध्ये आलेल्या 'अँड वन्स अगेन' चित्रपटात शेवटची दिसली होती. या चित्रपटात संन्यासीची भूमिका करण्यासाठी तिने प्रत्यक्षात आपलं मुंडण केलं होतं. या चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली. अंतरा सध्या कुठे आहे आणि ती काय करत आहे याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.
advertisement
8/8
अंतराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने 2009 मध्ये जेक्यू मासिकाचे संपादिक छे कुरियन यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर ती मोठ्या पडद्यापासून पूर्णपणे दूर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं' म्हणत आली, उर्मिलाला दिली टक्कर; आता कुठे गायब आहे अभिनेत्री!