Anushka Sharma- Virat Kohli: अनुष्का दुसऱ्यांदा झाली आई; विरुष्काच्या दुसऱ्या बाळाचं नाव आहे खूपच खास
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता अखेर अनुष्कानं दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. अनुष्कानं प्रेग्नन्ट असल्याची ही बातमी सगळ्यांपासून लपवली होती. आता अखेर दोघांच्या बाळाचा जन्म झाला असल्याची माहिती विराटने दिली आहे. पण त्यांच्या दुसऱ्या बाळाचं नाव काय आहे जाणून घ्या.
advertisement
1/6

हे मनोरंजनविश्वातील एक लोकप्रिय जोडपं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का प्रेग्नंट असून लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याची चर्चा होती.
advertisement
2/6
आता अखेर अनुष्का आणि विराटच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. विराटने एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
advertisement
3/6
अनुष्काने एका मुलाला जन्म दिला आहे. वामिकानंतर चार वर्षांनी या बाळाचा जन्म झाला आहे.
advertisement
4/6
अनुष्का आणि विराटने आपल्या मुलाच्या नावाचाही खुलासा केला आहे. वामिका या नावाप्रमाणेच या दुसऱ्या बाळाचं नाव युनिक आणि खास आहे.
advertisement
5/6
अनुष्का आणि विराटने आपल्या या बाळाचं नाव 'अकाय' असं ठेवलं आहे. ज्याचा अर्थ चंद्राशी संबंधित आहे.
advertisement
6/6
विराटची ही पोस्ट व्हायरल होत असून अनुष्का आणि विराटवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Anushka Sharma- Virat Kohli: अनुष्का दुसऱ्यांदा झाली आई; विरुष्काच्या दुसऱ्या बाळाचं नाव आहे खूपच खास