Guess Who: 83 वर्षीय अभिनेत्री, विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात तुटलेलं हृदय, आयुष्यभर अविवाहित राहिली
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Guess Who:बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सिंगल आहेत. 60 आणि 70 च्या दशकातील अशीच एक अभिनेत्री जी 'क्वीन ऑफ हार्ट्स' म्हणून ओळखली जायची आज ती 83 व्या वर्षीही एकटीच आयुष्य जगतेय.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सिंगल आहेत. 60 आणि 70 च्या दशकातील अशीच एक अभिनेत्री जी 'क्वीन ऑफ हार्ट्स' म्हणून ओळखली जायची आज ती 83 व्या वर्षीही एकटीच आयुष्य जगतेय.
advertisement
2/7
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा सिनेमागृहात या अभिनेत्रीचं नाव पुरेसं होतं. 60 आणि 70 च्या दशकात तीच होती ‘बॉक्स ऑफिस क्वीन’. तिचं करिअर जेवढं चर्चेत राहिलं तेवढंत तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेचा विषय ठरलं.
advertisement
3/7
आपण बोलत असलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आशा पारेख आहे. 2 ऑक्टोबरला अभिनेत्री तिचा 83 वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
4/7
गुजराती कुटुंबातून आलेली आशा पारेख लहानपणापासूनच नृत्यकलेत तरबेज होती. तिचा फिल्मी प्रवास ‘दिल देके देखो’पासून सुरू झाला. पाहता पाहता ती इंडस्ट्रीतील सर्वात महागडी आणि डिमांडमध्ये असलेली अभिनेत्री बनली.
advertisement
5/7
‘तीसरी मंजिल’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘कटी पतंग’, ‘आँ मिलो सजना’ आणि ‘मेरे सनम’ सारख्या सिनेमांनी तिला सुपरस्टार बनवलं. करिअरच्या शिखरावर असताना तिच्या आयुष्यात आलं प्रेम.
advertisement
6/7
दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्यावर ती मनापासून प्रेम करत होती. पण ते विवाहित होते. दुसऱ्याचं संसार मोडावं हे तिला मान्य नव्हतं. त्यामुळे तिने कधी लग्न केलं नाही. एका मुलाखतीत ती म्हणाली होती, "माझं प्रेम अपूर्ण राहिलं, पण त्याचं सुख हिरावून घ्यायचं नव्हतं." हीच गोष्ट तिच्या आयुष्यातील मोठं वळण ठरली. नंतर आशा पारेखने कधीच कोणाशी लग्न केलं नाही. ती आयुष्यभर कुमारी राहिली.
advertisement
7/7
आशा पारेख केवळ अभिनेत्री नाही तर समाजसेविका देखील आहे. ती ‘आशा पारेख हॉस्पिटल’च्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांसाठी काम करते. त्याशिवाय ती विविध चॅरिटेबल उपक्रमांशीही जोडलेली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: 83 वर्षीय अभिनेत्री, विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात तुटलेलं हृदय, आयुष्यभर अविवाहित राहिली