TRENDING:

मध्यरात्री किचनमध्ये साबणाचं पाणी, फिश टँकसमोर एकटीच बडबडायची; लग्नाच्या काही महिन्यातच मयुरीची झालेली अशी अवस्था

Last Updated:
Mayuri Wagh : अस्मिता या लोकप्रिय मालिकेनंतर तिने मालिकेतील सहकलाकार पियुश रानडेबरोबर लग्न. पण काही महिन्यातच त्यांचा डिवोर्स झाला. डिवोर्स दरम्यान मयुरीबरोबर काय घडलं हे तिनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.
advertisement
1/11
फिश टँकसमोर एकटीच बडबडायची, लग्नाच्या काही महिन्यातच मयुरीची झालेली अशी अवस्था
मनोरंजन एकत्र काम करणाऱ्या खऱ्या आयुष्यातही एकत्र येणाऱ्या निर्णय घेतला असं फार कमी वेळा. असे कलाकारही फार कमी आहेत. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे मयुरी वाघ. अस्मिता या लोकप्रिय मालिकेनंतर तिने मालिकेतील सहकलाकार पियुश रानडेबरोबर लग्न केलं. पण काही महिन्यातच त्यांचा डिवोर्स झाला.
advertisement
2/11
पियुशकडून मयुरीला शारिरीक आणि मानसिक त्रास झाल्याचा खुलासा झाला आहे. मित्र म्हणे या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मयुरी तिच्या डिवोर्सबद्दल पहिल्यांदाच बोलली.
advertisement
3/11
मयुरी म्हणाली, "मी लग्नाचा निर्णय खूपच लवकर घेतला. सहा महिन्यातच कळलं की निर्णय चुकला पण हे मला कळायला वेळ लागला."
advertisement
4/11
"माझ्या आई-बाबांना 4 महिन्यात कळलं होतं की हे चुकलंय पण मला कळायला दीड वर्ष गेला. मला तेव्हा वाटायचं की हे माझ्याबरोबर नाही घडू शकत. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला ती माझ्याबरोबर असू शकत नाही."
advertisement
5/11
या काळात मयुरी ती फुलराणी या मालिकेचं शूटींग करत होती. मयुरीने सांगितलं, "मालिकेतील माझ्या सहकलाकारांना मी थँक्यू बोलते कारण त्याकाळात ते माझ्याबरोबर असायचे."
advertisement
6/11
"त्यांना कळत होतं की हिच्या आयुष्यात काही तरी घडतंय. पण ती शेअर करू शकत नाहीये. पण ते माझ्याबरोबर असायचे. त्यांना कळायचं की ही डिस्टर्ब आहे. सीन सोडला तर हिच्या डोक्यात काही तरी चालू आहे."
advertisement
7/11
मयुरीने सांगितलं, "शूट संपलं, पॅकअप झाल्यानंतर मला असं वाटलं की मी आता झोपते तरीही ते माझ्याबरोबर असायचे. ते माझ्या घरी यायचे. आम्ही पहाटे, 2-3-4 वाजेपर्यंत असायचो कारण मला रात्री झोप यायची नाही. हे लोक माझ्याबरोबर बसायचे."
advertisement
8/11
"त्या काळात मी मालिका करत होते. सकाळी 8 चं कॉल टाइम आहे. मी पहाटे 5 वाजता झोपलेय. रात्री 2.30 वाजता वगैरे मी मशीनच लावायचे. मी संपूर्ण किचन बाहेर काढून साबणाचं पाणी वगैरे टाकून घासलंय. मला माझं डोकं शांत करायचं होतं. मी खूप क्रेझी गोष्टी केल्यात."
advertisement
9/11
मयुरी पुढे म्हणाली, "तेव्हा मी एकटी असायचे घरात. मी घरात फिश आणून ठेवले होते. मी त्यांच्याशी बोलायचे की, असं होतं, तसं होतं. कारण मला तेव्हा कोणाशीतरी बोलायचं असायचं."
advertisement
10/11
"तेव्हा सगळे मित्र मैत्रिणी होते पण मला त्यांच्यासमोर बोलता येत नव्हतं. काय घडतंय हे स्वीकारायला मी तयार नव्हते."
advertisement
11/11
"मला माझ्या आई-वडिलांसमोर रडायला आवडत नाही, आई-वडिलांना माझ्यामुळे त्रास होईल असं वागायला मला आवडत नाही. त्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक गोष्टी माहितीच नाहीत. त्यांना त्याचं खूप वाईट वाटेल. त्यामुळे मी मग असल्या काही तरी गोष्टी करायचे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मध्यरात्री किचनमध्ये साबणाचं पाणी, फिश टँकसमोर एकटीच बडबडायची; लग्नाच्या काही महिन्यातच मयुरीची झालेली अशी अवस्था
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल