TRENDING:

Govinda-Sunita Ahuja : 'मी मेले तरी चालेल पण...', सुनीता यांनी डॉक्टरांना सांगितलं असं काही... गोविंदा ढसाढसा रडत होता

Last Updated:
Govinda Sunita Divorce : एका जुन्या मुलाखतीतील सुनीतांचं एक वक्तव्य पुन्हा एकदा समोर आलं आहे, जे खूपच भावनिक आहे. मुलाच्या जन्मावेळी त्यांनी डॉक्टरांना जे काही सांगितलं, ते ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल.
advertisement
1/7
'मी मेले तरी चालेल पण...', सुनीता यांनी डॉक्टरांना सांगितलं असं काही...
मुंबई: गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू असतानाच, एका जुन्या मुलाखतीतील सुनीतांचं एक वक्तव्य पुन्हा एकदा समोर आलं आहे, जे खूपच भावनिक आहे. मुलाच्या जन्मावेळी त्यांनी डॉक्टरांना जे काही सांगितलं, ते ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल.
advertisement
2/7
१९८७ मध्ये गोविंदा आणि सुनीता यांनी लग्न केलं. पण करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी लग्नाची गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती. लग्नानंतर वर्षभराने त्यांना मुलगी झाली, जिचं नाव टीना आहूजा आहे. त्यानंतर आठ वर्षांनी त्यांना मुलगा झाला, यशवर्धन.
advertisement
3/7
‘ईट ट्रॅव्हल रिपीट’ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी यशच्या जन्मावेळचा प्रसंग सांगितला. तो दिवस त्यांच्यासाठी खूप कठीण होता. त्या म्हणाल्या, “जेव्हा मी यशला जन्म देत होते, तेव्हा माझं वजन १०० किलो होतं. मला असं वाटत होतं की मी आता मरेन. मला पाहून गोविंदा रडू लागला.”
advertisement
4/7
सुनीता यांनी पुढे सांगितलं, “त्यावेळी गर्भलिंग निदान चाचणी कायदेशीर होती. त्यामुळे आम्हाला मुलगा होणार आहे, हे आम्हाला माहीत होतं. मी डॉक्टरांना सांगितलं, ‘डॉक्टर, माझ्या पतीला मुलगा हवा आहे. प्लीज माझ्या मुलाला वाचवा, मी मेले तरी चालेल.’”
advertisement
5/7
सुनीतांचं हे बोलणं ऐकून गोविंदा आणखी जोरात रडू लागला. सुनीता म्हणाल्या की, त्यांच्या सगळ्यांसाठी तो एक खूपच ‘फिल्मी क्षण’ होता.
advertisement
6/7
सुनीता आणि गोविंदा यांच्या नात्यात दुरावा आल्याची जोरदार चर्चा आहे. ‘हॉटरफ्लाय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुनीता आहूजा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्या हे दोघे कोर्टाने बंधनकारक केलेल्या काउन्सेलिंगच्या प्रक्रियेतून जात आहेत.
advertisement
7/7
या सगळ्यावर गोविंदाच्या वकिलांनी मात्र, हे दोघे एकत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यात काही वाद झाले होते, पण ते आता मिटले आहेत, असं वकिलांनी स्पष्ट केलं. पण, सुनीतांनी अनेक मुलाखतींमध्ये गोविंदावर थेट फसवणुकीचे आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्या नात्यातील गुंतागुंत अजूनही कायम असल्याचं दिसून येतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda-Sunita Ahuja : 'मी मेले तरी चालेल पण...', सुनीता यांनी डॉक्टरांना सांगितलं असं काही... गोविंदा ढसाढसा रडत होता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल