TRENDING:

पहिल्या बायकोला दिला धोका, दुसरीसोबत 6 मुलं, आता तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 61 वर्षीय अभिनेता

Last Updated:
Hollywood Actor : 61 वर्षीय प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत असून हे त्याचे तिसरे लग्न आहे.
advertisement
1/6
पहिल्या बायकोला दिला धोका, दुसरीसोबत 6 मुलं, आता तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार
हॉलिवूडचा चार्मिंग आणि नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता ब्रॅड पिट पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीत आहे. ६१ व्या वर्षी आयुष्याची नवी इनिंग सुरू करत तो तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. यावेळी ब्रॅडने आपल्या सध्याच्या प्रेयसी आणि ज्वेलरी डिझायनर इनेस डी रामोन हिला लग्नासाठी प्रपोज केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/6
‘राडारऑनलाइन’च्या रिपोर्टनुसार, ब्रॅड पिटने नुकतंच न्यूझीलंडमध्ये सुरू होणाऱ्या एका सहा आठवड्यांच्या शूटिंगच्या आधी इनेसला प्रपोज केलं. ३२ वर्षीय इनेस हीदेखील ब्रॅडप्रमाणेच आपल्या पहिल्या विवाहातून बाहेर पडली आहे. ती 'द व्हॅम्पायर डायरीज' फेम अभिनेता पॉल वेस्लीची पत्नी होती. त्यांनी २०१९ मध्ये लग्न केलं होतं आणि २०२२ मध्ये ते विभक्त झाले.
advertisement
3/6
ब्रॅड पिट आणि इनेस २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. ब्रॅडचे जवळचे मित्र म्हणतात की, “एंजेलिना जोलीपासून विभक्त झाल्यानंतर ब्रॅड आता खऱ्या अर्थाने मोकळा आणि स्थिर वाटतो. त्याला इनेससोबतच आयुष्य घालवायचं आहे. तो तिच्यासाठी कायमचा आधार बनू इच्छितो.”
advertisement
4/6
ब्रॅड पिटचं हे तिसरं लग्न असेल. याआधी त्याने २००० मध्ये अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टनशी लग्न केलं होतं. मात्र, 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस स्मिथ'च्या शूटिंगदरम्यान एंजेलिनाशी जवळीक वाढल्यानं २००५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर ब्रॅड-एंजेलिनाची जोडी 'ब्रँजेलिना' या नावाने लोकप्रिय झाली. त्यांनी २०१४ मध्ये फ्रान्समधल्या शॅटो मिरावल इथे लग्न केलं. या कपलला सहा मुलं आहेत, त्यापैकी तीन मुलं त्यांनी दत्तक घेतली होती.
advertisement
5/6
मात्र २०१६ मध्ये एंजेलिनाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि तब्बल आठ वर्षं चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर ३० डिसेंबर २०२४ रोजी त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. यामध्ये मुलांची कस्टडी आणि मालमत्तेवरून मोठा वाद निर्माण झाला होता.
advertisement
6/6
आता, इनेससोबतचं नातं ब्रॅडसाठी वेगळं आणि अधिक स्थिर आहे. रिपोर्टनुसार हे दोघंही या वर्षीच्या शेवटी एका चर्चमध्ये साध्या पद्धतीने लग्न करण्याच्या तयारीत आहेत. हॉलिवूडमधला हा 'एव्हरग्रीन हँडसम' पुन्हा एकदा बोहोल्यावर चढणार आहे. चाहत्यांच्या नजरा आता त्याच्या या नव्या सुरुवातीकडे लागून राहिल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिल्या बायकोला दिला धोका, दुसरीसोबत 6 मुलं, आता तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार 61 वर्षीय अभिनेता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल