Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात जुगलबंदी, वर्षा ताई अन् सुप्रिया पिळगांवकर आल्या आमने-सामने!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
'बिग बॉस मराठी 5' चा आज 57 वा दिवस आहे. रोज स्पर्धकांमध्ये वाद, भांडण, मजा-मस्ती सुरूच असते. आजचा भाग खूपच विशेष आहे. आज 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची बिग बॉसमध्ये येणार आहे.
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी 5' चा आज 57 वा दिवस आहे. रोज स्पर्धकांमध्ये वाद, भांडण, मजा-मस्ती सुरूच असते. आजचा भाग खूपच विशेष आहे. आज 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची बिग बॉसमध्ये येणार आहे.
advertisement
2/7
आज स्वप्नील जोशी, सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक सराफ बिग बॉसच्या घरात जाणार आहेत. आज 'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा ताई आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यात डान्सची जुगलबंदी रंगणार आहे.
advertisement
3/7
'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये डॉ. निलेश साबळे म्हणत आहे, "सुप्रिया ताई तुमचं गाणं लागेल तेव्हा वर्षा ताईंनी परफॉर्म करायचं." त्यानंतर सुप्रिया ताई आणि वर्षा ताई 'घे पाऊल पुढे जरा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
advertisement
4/7
पुढे डॉ. निलेश साबळे म्हणत आहे, "वर्षा ताईंचं गाणं लागेल तेव्हा सुप्रिया ताई डान्स करणार". त्यानंतर "मी आले", या गाण्यावर त्या थिरकताना दिसत आहेत.
advertisement
5/7
सुप्रिया ताई आणि वर्षा ताईंचा डान्स प्रेक्षकांना आवडेलच. पुढे डॉ. निलेश साबळे लाडक्या अशोक मामांना प्रश्न विचारताना दिसत आहे. "तुमच्या घरी 'बिग बॉस' कोण?". याचं उत्तर देत मामा म्हणतात, "निवेदिता ताई... माझ्या मर्मावर बोट ठेवलंस".
advertisement
6/7
नवरा माझा नवसाचा 2 ची टीम आल्यामुळे आजचा भाग खास होणार आहे. त्यामुळे स्पर्धकही हा खास एपिसोडमध्ये मजा घेताना दिसणार आहे. त्यामुळे आजच्या एपिसोडमध्ये मनोरंजनाची मेजवानी पहायला मिळेल.
advertisement
7/7
दरम्यान, बिग बॉसच्या घरात आज सदस्य आपल्या आवडत्या कलाकारांसोबत मजेदार टास्कही खेळताना दिसणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात जुगलबंदी, वर्षा ताई अन् सुप्रिया पिळगांवकर आल्या आमने-सामने!