'मी कधीच त्याची आई...' सावत्र आईसोबत कसं आहे अक्षयचं नातं? कविता खन्नांनी पहिल्यांदाच सगळं सांगितलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Akshaye Khanna Step-Mother: विनोद खन्ना यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी अक्षय खन्नासोबतच्या आपल्या नात्याबद्दल आणि लग्नावेळी आलेल्या विरोधाबद्दल केलेले खुलासे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
advertisement
1/13

मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' चित्रपटाचा डंका वाजतोय आणि त्यातील 'रहमान डकैत' साकारणाऱ्या अक्षय खन्नाचं नाव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या ओठावर आलं आहे.
advertisement
2/13
अक्षय खन्नाच्या यशाच्या या काळात त्याचे वडील, दिवंगत सुपरस्टार विनोद खन्ना यांच्या आयुष्यातील काही जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.
advertisement
3/13
विशेषतः विनोद खन्ना यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी अक्षय खन्नासोबतच्या आपल्या नात्याबद्दल आणि लग्नावेळी आलेल्या विरोधाबद्दल केलेले खुलासे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
advertisement
4/13
विनोद खन्ना यांचं आयुष्य एखाद्या फिल्मी कथेसारखं राहिलं आहे. १९७१ मध्ये त्यांनी आपली कॉलेज मैत्रीण गीतांजलीशी लग्न केलं, ज्यांच्यापासून त्यांना राहुल आणि अक्षय ही दोन मुलं झाली.
advertisement
5/13
मात्र, १९८५ मध्ये घटस्फोट घेऊन त्यांनी ग्लॅमरची दुनिया सोडली आणि ओशो रजनीश यांच्या चरणी लीन झाले. पण, नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. १९९० मध्ये त्यांच्या आयुष्यात २८ वर्षांच्या कविता यांची एन्ट्री झाली.
advertisement
6/13
विनोद खन्ना जेव्हा कविता यांच्या प्रेमात पडले, तेव्हा त्यांचं वय ४४ होतं, तर कविता अवघ्या २८ वर्षांच्या होत्या. एका पार्टीत कविता यांना पाहताच विनोद खन्ना त्यांच्या प्रेमात पडले.
advertisement
7/13
कविता यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, "विनोद यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं की, त्यांना पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकायचं नाहीये."
advertisement
8/13
कविता यांच्या घरच्यांना मात्र ही गोष्ट अजिबात पटली नव्हती. घरच्यांनी आणि मित्रपरिवाराने कविता यांना या लग्नापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला. "तू अशा व्यक्तीसोबत का राहतेस ज्याला तुझ्याशी लग्नच करायचं नाहीये?" असा प्रश्न त्यांना विचारला जायचा.
advertisement
9/13
पण कविता आपल्या निर्णयावर ठाम होत्या. अखेर विनोद खन्ना यांनीच पुढाकार घेऊन कविता यांना लग्नाची मागणी घातली आणि १९९० मध्ये हे लग्न पार पडलं.
advertisement
10/13
अक्षय आणि राहुल खन्ना यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल कविता खन्ना यांनी अतिशय मॅच्युअर भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, "मी कधीच अक्षय किंवा राहुलची आई बनण्याचा प्रयत्न केला नाही. आमचं नातं खूप नाजूक होतं, पण आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत."
advertisement
11/13
कविता यांनी कबूल केलं की, सुरुवातीच्या काळात अक्षय आणि राहुल यांनाच जास्त जुळवून घ्यावं लागलं. त्या दोघांशी वागताना कविता नेहमीच सावध असायच्या जेणेकरून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत.
advertisement
12/13
आज अक्षय खन्ना ज्या उंचीवर पोहोचला आहे, ते पाहून कविता खन्ना यांना अभिमान वाटतो. खन्ना कुटुंबातील हा समजूतदारपणाच त्यांच्या नात्यातील गोडवा टिकवून आहे.
advertisement
13/13
विनोद खन्ना यांनी दुसऱ्या लग्नानंतर आपल्या मुलांसोबतचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे घालवला आणि ते एक बेटर फादर ठरल्याचं त्यांनी स्वतः कबूल केलं होतं. आज 'धुरंधर'च्या निमित्ताने अक्षय खन्नाच्या यशात खन्ना कुटुंबाचा हा बॉण्ड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी कधीच त्याची आई...' सावत्र आईसोबत कसं आहे अक्षयचं नातं? कविता खन्नांनी पहिल्यांदाच सगळं सांगितलं