डीपी दादा जोमात, अंकिता कोमात! लग्न लागताच दिला आशिर्वाद; म्हणाले, 'वर्षभरात जुळे...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
dhananjay powar Ankita walawalkar : बिग बॉस मराठी सीझन 5 ची स्पर्धक अंकिता वालावलकर हिने कुणाल भगतसोबत लग्न केलं. डीपी दादांनी लग्नाला हजेरी लावून गाडीभरून आहेर दिला, भावाच्या नात्याने कुणालचे कानही पिळले अन् निघता निघता अंकिताला सॉलिड आशिर्वादही दिला.
advertisement
1/8

बिग बॉस मराठी सीझन 5 ची स्पर्धक आणि प्रसिद्ध युट्यूबर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने नुकतंच लग्न केलं.
advertisement
2/8
कुणाल भगत बरोबर अंकिताने लग्नगाठ बांधली. दोघेही लग्नानंतर प्रचंड खुश आहेत. अंकिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/8
अंकिताने लग्नासाठी बिग बॉस मराठी 5 च्या सगळ्या टीमला बोलावलं होतं. तरी त्यातील काही मंडळी लग्नाला उपस्थित राहू शकली नाहीत. महाराष्ट्राचे लाडके डीपी दादांनी मात्र अंकिताच्या लग्नाला आवर्जून हजेरी लावली होती.
advertisement
4/8
डीपी दादा सहकुटुंब अंकिताच्या लग्नासाठी कोकणात गेले होते. अंकिताच्या लग्नाच्या सगळ्या विधींना डीपी दादांनी हजेरी लावली होती.
advertisement
5/8
अंकिता आणि डीपी यांची मैत्री बिग बॉसमध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. अंकिताच्या लग्नात तिला गाडीभरून आहेर देणार असं डीपी दादांनी सगळ्यांसमोर सांगितलं होतं.
advertisement
6/8
सांगितल्याप्रमाणे डीपी दादांनी अंकिताच्या लग्नात गाडीभरून आहेर नेला. मानलेल्या बहिणीला आहेर देऊन डीपी दादांनी तिला आशीर्वाद देखील दिला.
advertisement
7/8
डीपी दादा म्हणाले, "कोणत्याही परिस्थितीमध्ये तिने डगमगता कामा नये. आजपर्यंत निर्भीड व्यक्तिमत्व असल्याचं तिने दाखवलं आहे. पुढच्या काळातही तिने तसंच राहावं. तिला समजून घेणारा नवरा तिला मिळाला आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे."
advertisement
8/8
लग्नानंतर अंकिताकडून कोणत्या अपेक्षा आहेत असं विचारलं असता डीपी दादा म्हणाले, "तिच्याकडून अपेक्षांचं म्हटल्यास, लगेच वर्षाभरात एखादं जुळ होऊन जाऊ देत."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डीपी दादा जोमात, अंकिता कोमात! लग्न लागताच दिला आशिर्वाद; म्हणाले, 'वर्षभरात जुळे...'