प्रसिद्ध अभिनेत्याची अमानुष हत्या, Homosexuality मुळे गेला जीव? शेजाऱ्याने घराबाहेरच झाडल्या गोळ्या
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jonathan Jos : प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता जोनाथन जोस यांची टेक्सासमध्ये गोळ्या घालून हत्या झाली. पोलिसांनी सिगफ्रेडो अल्वारेज सेजा याला अटक केली आहे.
advertisement
1/5

मुंबई : हॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि संगीतकार जोनाथन जोस यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. 'किंग ऑफ द हिल' या प्रसिद्ध अॅनिमेटेड टीव्ही मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या या ५९ वर्षीय अभिनेत्याला टेक्सासमधील त्याच्या घराशेजारीच गोळ्या घालण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, पण या हत्येमागील कारण अजूनही गूढ आहे.
advertisement
2/5
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी २ जून, २०२५ च्या संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांना गोळीबाराची माहिती मिळाली. दक्षिण सॅन अँटोनियो परिसरातील घटनेच्या ठिकाणी पोलीस पोहोचले, तेव्हा जोनाथन जोस रस्त्याच्या जवळ जखमी अवस्थेत पडलेले दिसले. सॅन अँटोनियो पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "ईएमएस येईपर्यंत अधिकाऱ्यांनी जोनाथनचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले, परंतु ईएमएसने त्याला मृत घोषित केलं."
advertisement
3/5
या घटनेनंतर, जोनाथन जोस यांचे मित्र डी. गोंझालेस यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. ते म्हणाले की, त्यांना आणि जोनाथन जोस यांना यापूर्वीही छळाचा सामना करावा लागला होता. जोनाथनला गोळ्या घालण्यापूर्वी आरोपीने समलैंगिकतेविरोधात अपशब्द वापरले, असं गोंझालेस यांनी सांगितलं. गोंझालेस यांच्या मते, "दोन पुरुषांनी एकमेकांवर प्रेम करणं ते पाहू शकत नव्हते, म्हणूनच त्याची हत्या केली."
advertisement
4/5
डी. गोंझालेस यांनी घटनेचा तपशील देताना सांगितलं की, गोळीबार होण्यापूर्वी ते आणि जोनाथन घरी मेल तपासत होते. जानेवारी महिन्यात त्यांच्या घरात भीषण आग लागली होती, त्यात त्यांच्या घराचं मोठं नुकसान झालं होतं आणि त्यांच्या तीन कुत्र्यांनी जीव गमावला होता. गोंझालेस म्हणाले, "त्यानंतर एक माणूस आला आणि त्याने बंदुका दाखवून धमकी दिली. जोनाथन आणि माझ्याकडे शस्त्रं नव्हती. जेव्हा त्या माणसाने गोळीबार केला, तेव्हा आम्ही एकत्र उभे होतो. जोनाथनने मला बाहेर ढकललं. त्याने माझं आयुष्य वाचवलं." या घटनेनंतर पोलिसांनी ५६ वर्षीय सिगफ्रेडो अल्वारेज सेजा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर जोनाथनच्या खुनाचा आरोप आहे.
advertisement
5/5
सॅन अँटोनियो पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "सध्याच्या चौकशीत अजून तरी असा कोणताही पुरावा सापडला नाही, जो श्री. जोस यांना त्यांच्या समलैंगिकतेमुळे ठार मारण्यात आलं हे दर्शवतो. आम्ही असे आरोप अतिशय गांभीर्याने घेत आहोत आणि सर्व शक्यतांची चौकशी करत आहोत. जर कोणताही नवीन पुरावा समोर आला, तर आम्ही संशयितावर त्यानुसार आरोप करू." जोनाथन जोस यांच्या अकाली निधनाने हॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्याच्या हत्येमागील खरं कारण काय आहे, हे पोलिसांच्या पुढील तपासातूनच समोर येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध अभिनेत्याची अमानुष हत्या, Homosexuality मुळे गेला जीव? शेजाऱ्याने घराबाहेरच झाडल्या गोळ्या