TRENDING:

Govinda : 'त्याच्या मस्तीमुळेच हे होतंय...', लोकप्रिय लेखिकेने केली गोविंदाची पोलखोल, म्हणते 'तो ही हालत डिझर्व्ह करतो'

Last Updated:
Govinda Controversy : प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी गोविंदाचा एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे, ज्यात त्यांनी गोविंदाबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.
advertisement
1/11
'तो ही हालत डिझर्व्ह करतो', लोकप्रिय लेखिकेने केली गोविंदाची पोलखोल
मुंबई: ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुपरस्टार अभिनेता गोविंदा त्याच्या मस्तीखोर स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याच्या या वागणुकीमुळे अनेक दिग्दर्शक आणि सहकलाकार त्रस्त होते.
advertisement
2/11
आता प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी गोविंदाचा एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे, ज्यात त्यांनी दाऊद इब्राहिमबद्दल बोललेल्या गोष्टी उघड केल्या आहेत.
advertisement
3/11
अनिता पाध्ये यांनी एका मुलाखतीत गोविंदाबद्दलचा त्यांचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, “मला ‘चीची’चा खूप वाईट अनुभव आलाय. सुरुवातीला तो माझ्याशी चांगला बोलायचा. पण त्याला त्याच्या आजूबाजूला चमचे ठेवायची सवय होती. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला नेहमी गर्दी असायची.”
advertisement
4/11
गोविंदा सेटवर कधीही वेळेवर येत नसे. ९ वाजताची शिफ्ट असेल तर तो ३ किंवा ३.३० वाजता सेटवर यायचा. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाच्या सेटवर तर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांसारखे मोठे कलाकार त्याची वाट बघत बसायचे.
advertisement
5/11
अनिता पाध्ये म्हणतात, “आज गोविंदाची जी परिस्थिती आहे, ती तो डिझर्व्ह करतो. तो त्याच्या करिअरच्या टॉपवर असताना इतक्या मस्तीत वागलाय.”
advertisement
6/11
एकदा अनिता पाध्ये गोविंदाची मुलाखत घेण्यासाठी त्याच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी भारतात बॉम्बस्फोट झाले होते आणि अनेक लोकांची नावं दाऊद इब्राहिमशी जोडली गेली होती.
advertisement
7/11
गोविंदा दाऊदच्या कार्यक्रमांना शूटिंग सोडून जायचा. दाऊदच्या भावासोबत त्याचे फोटोही व्हायरल झाले होते.
advertisement
8/11
अनिता म्हणाल्या, 'मुलाखतीदरम्यान गोविंदा हुशारीत दाऊदबद्दल बोलू लागला. 'दाऊद माझा मित्र आहे,' असं तो म्हणाला आणि त्याची खूप स्तुती केली.
advertisement
9/11
मुलाखत संपल्यानंतर त्याला जाणवलं की तो काहीतरी जास्तच बोललाय. त्याने माझ्याकडे रेकॉर्ड केलेली टेप मागितली. ‘तू तर मला जेलमध्ये टाकशील,’ असं तो म्हणाला.'
advertisement
10/11
अनिताने ती टेप त्याला दिली नाही, तेव्हा त्याने ती जबरदस्तीने काढून घेतली आणि त्यातील रेकॉर्डिंग डिलीट केलं. तो म्हणाला, ‘हा इंटरव्ह्यू छापलास, तर मी संपून जाईन.’
advertisement
11/11
तेव्हा अनिताने त्याला सांगितलं, “तू आता काढून घेतलंस तरी २० वर्षांनी जरी मला कोणी विचारलं, तरी मी सांगू शकेन. कारण ते माझ्या डोक्यात आहे.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda : 'त्याच्या मस्तीमुळेच हे होतंय...', लोकप्रिय लेखिकेने केली गोविंदाची पोलखोल, म्हणते 'तो ही हालत डिझर्व्ह करतो'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल