पाव्हन जेवला काय...! संपूर्ण महाराष्ट्राला नाचवलं, आता टेलिव्हिजन गाजवणार गौतमी पाटील
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gautami Patil Cooking Show : गौतमी पाटील रिअलिटी शोमध्ये दिसणार आहे. नेहमी पाव्हनं जेवला काय विचारणारी गौतमी आता स्वत: जेवण बनवताना दिसणार आहे.
advertisement
1/9

गौतमी पाटील ठसकेबाज डान्स आणि स्टेज परफॉर्मन्समुळे संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गौतमी पाटीलने स्टेज शो केले. ती महाराष्ट्रातली सगळ्यात चर्चेत असलेली नृत्यांगना बनली आहे.
advertisement
2/9
आता ती लवकरच छोट्या पडद्यावरही आपली छाप पाडायला सज्ज झाली आहे. 26 एप्रिल पासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या शिट्टी वाजली रे या नवीन कार्यक्रमात गौतमी भाग घेत आहे.
advertisement
3/9
गौतमीचं नृत्यकौशल्य तर महाराष्ट्राला माहितीच आहे पण आता शिट्टी वाजली रे या कार्यक्रमातून ती स्वयंपाकातही हात आजमावणार आहे.
advertisement
4/9
या कार्यक्रमात सहभागी कलाकारांना वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे टास्क दिले जाणार आहेत. पण हे पदार्थ बनवताना त्यांच्या गोंधळलेल्या प्रतिक्रिया आणि धमाल पाहायला मिळणार आहे.
advertisement
5/9
या कार्यक्रमाविषयी बोलताना गौतमीने सांगितलं, "स्टार प्रवाह माझ्यासाठी खूप खास आहे. याच वाहिनीमुळे मला एक वेगळी ओळख मिळाली."
advertisement
6/9
"शिट्टी वाजली रे हे माझं टीव्हीवरचं पहिलं काम आहे. खरं सांगायचं तर मला जेवण बनवता येत नाही, त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी एक नवीन अनुभव असणार आहे."
advertisement
7/9
हा कार्यक्रम केवळ पोटभरी जेवणासाठी नाही, तर हसता हसता पोट दुखेपर्यंत मनोरंजनासाठी आहे. कलाकारांच्या जोडीने स्वयंपाक करताना त्यांच्या मजेशीर गोंधळाचा आनंद प्रेक्षक घेणार आहेत.
advertisement
8/9
अभिनेता अमेय वाघ या कार्यक्रमाचा होस्ट आहे. तर ‘पूर्णब्रह्म’ रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका निभावणार आहेत.
advertisement
9/9
शिट्टी वाजली रे हा शो 26 एप्रिलपासून दररोज रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. गौतमी बरोबरच या कार्यक्रमात अभिनेत्री रूपाली भोसले, पुष्कर श्रोत्री, छोटा पुढेरी आणि स्मिता गोंदकर देखील असणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पाव्हन जेवला काय...! संपूर्ण महाराष्ट्राला नाचवलं, आता टेलिव्हिजन गाजवणार गौतमी पाटील