Govinda: 18 वर्षांपासून एकही हिट सिनेमा नाही, मग गोविंदा कुठून करतो एवढी बक्कळ कमाई?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Govinda: बॉलिवूडचा हिरो नंबर 1 म्हणजेच गोविंदा. आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगने, स्टायलिश डान्स मूव्हजने आणि हटके संवादफेकीने त्याने 90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला.
advertisement
1/7

बॉलिवूडचा हिरो नंबर 1 म्हणजेच गोविंदा. आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगने, स्टायलिश डान्स मूव्हजने आणि हटके संवादफेकीने त्याने ९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला.
advertisement
2/7
गोविंदाचे नाव ऐकलं की आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. पण आज तो चित्रपटांपासून दूर आहे. तरीदेखील त्याचा लाइफस्टाईल अजूनही राजेशाहीच आहे. 18 वर्षांपासून एकही हिट न देता गोविंदा एवढी बक्कळ कमाई कुठून करतो?
advertisement
3/7
गोविंदाने 1986 मध्ये ‘इल्जाम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पहिल्याच चित्रपटाने त्याला मोठं यश मिळालं. नंतर शोला और शबनम, राजा बाबू, कुली नं. 1, हीरो नं. 1, साजन चले ससुराल अशा डझनभर सुपरहिट चित्रपटांमुळे तो प्रेक्षकांच्या मनात हिरो नं. 1 म्हणून घर करून बसला.
advertisement
4/7
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार गोविंदाकडे तब्बल 170 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. एका चित्रपटासाठी तो 6 कोटी रुपये घेतो. ब्रँड एंडोर्समेंटसाठी त्याची फी 2 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
advertisement
5/7
त्याचे मुंबईतील जुहूमध्ये 16 कोटींचे आलिशान घर आहे. मढ बेटावर त्याने आणखी एक घर घेतलं असून ते शूटिंगसाठी भाड्याने देतो. त्याच्याकडे कोलकाता, लखनऊ आणि रायगड येथेही मालमत्ता आहे.
advertisement
6/7
गोविंदाच्या गॅरेजमध्येही हाय-प्रोफाईल गाड्यांची रांग आहे. त्याच्याकडे BMW, Mercedes-Benz आणि Audi सारख्या महागड्या गाड्या असल्याचे म्हटले जाते.
advertisement
7/7
2019 मध्ये आलेल्या रंगीला राजा नंतर तो पडद्यावर फारसा दिसला नाही. पण चाहत्यांना अजूनही त्याच्या कमबॅकची आतुरतेने वाट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda: 18 वर्षांपासून एकही हिट सिनेमा नाही, मग गोविंदा कुठून करतो एवढी बक्कळ कमाई?