TRENDING:

Govinda - Sunita Divorce : 'गणेश चतुर्थीची वाट बघा', गोविंदाच्या डिवोर्सवर मॅनेजरचा मोठा खुलासा; सस्पेन्स वाढला

Last Updated:
Govinda-Sunita Divorce : अभिनेता गोविंदा आणि सुनिता यांच्या डिवोर्स प्रकरणात मॅनेजर शशि सिन्हा यांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी समोर येत दोघांच्या डिवोर्सबद्दल मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/7
'गणेश चतुर्थीची वाट बघा', गोविंदाच्या डिवोर्सवर मॅनेजरचा मोठा खुलासा
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांचा डिवोर्स होणार आहे अशा चर्चा सुरू आहे. सुनितानं डिवोर्स फाइल केल्याने त्यांचा 38 वर्षांचा संसार मोडल्याचं सांगण्यात येतंय.
advertisement
2/7
दोघांच्या डिवोर्सची बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच गोविंदाच्या डिवोर्सचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. गोविंदाचा मॅनेजर शशि सिन्हा यांनी समोर येत मोठा खुलासा केला आहे.
advertisement
3/7
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना शशि सिन्हा म्हणाले, "प्रत्येक कपलमध्ये थोडेफार मतभेद असतात. हे सगळं जुनं प्रकरण आहे. पण आता काही लोक त्याला मिर्च-मसाला लावून आपल्या फायद्यासाठी वापरत आहेत."
advertisement
4/7
सुनीता यांनी गोविंदावर अफेअर, अत्याचार आणि एकटे सोडून देण्याचे आरोप केले आहेत. यावर शशि म्हणाले, "गोविंदा कधीच कोणावर हात उचलू शकत नाहीत. ते कोणाला शिवीगाळ करू शकत नाहीत. मी त्यांच्यासोबत जवळून काम केलं आहे. त्यांची जी इमेज तयार केली जात आहे ती अत्यंत चुकीची आहे."
advertisement
5/7
शशि यांनी सांगितलं की, गोविंदा कोर्टात हजर झाले नाहीत. सुनीता देखील फक्त एकदाच कोर्टात गेल्या होत्या तेव्हा त्यांनी केस फाईल केली होती. कुठल्या कपलमध्ये प्रॉब्लेम नसतो? सुनीता गोविंदावर खूप प्रेम करतात आणि दोघेही एकत्र आहेत. त्यांचा डिवोर्स होणार नाही. दोघेही आपल्या मुलांच्या करिअर आणि लग्नावर फोकस करत आहेत.
advertisement
6/7
शशि पुढे म्हणाले, "फक्त व्यूज मिळवण्यासाठी इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जात आहेत. यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. गोविंदाने कधीच सुनीता बद्दल वाईट बोलले नाही. काही मुलाखतीत सुनिताकडून गोविंदाविरोधात चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या. आता गणेशोत्सव येत आहे तुम्हाला सगळे एकत्र दिसतील. तुम्ही घरी या."
advertisement
7/7
आता शशि सिन्हा यांनी सांगितल्यानुसार, गणेश चतुर्थीला खरंच गोविंदा आणि सुनिता एकत्र दिसणार का? नेमकं काय चित्र पहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda - Sunita Divorce : 'गणेश चतुर्थीची वाट बघा', गोविंदाच्या डिवोर्सवर मॅनेजरचा मोठा खुलासा; सस्पेन्स वाढला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल